अभिनेता नील नितीन मुकेश बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यावरून गायब आहे. नील शेवटचा ‘हिसाब बराबर’ चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये तो राधे मोहनच्या भूमिकेत दिसला होता. आता अलीकडेच अभिनेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो अनुष्का सेनबरोबर दिसत आहे.
अनुष्का सेनचा व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. आता या व्हायरल क्लिपमध्ये दोघांमधील एक क्षण दाखविला आहे, जो खूपच असामान्य दिसत आहे. मंगळवारी (१३ मे) अनुष्का मुंबईत नील आणि जॅकलिन फर्नांडिसच्या म्युझिकल ड्रामा ‘है जुनून’च्या प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या या व्हिडीओमध्ये नील अनुष्काशी चिडून बोलताना दिसत आहे. तो बोलत असताना बोटही दाखवत आहे आणि त्याचे हावभाव बघून असे वाटत आहे की, तो नाराज आहे किंवा रागावला आहे.
नीलने इन्स्टावर शेअर केली स्टोरी
चाहत्यांना लगेचच तणावपूर्ण वातावरण लक्षात आले आणि त्यांनी दोघांमध्ये काय घडले असावे याबद्दल अंदाज करण्यास सुरुवात केली. याचा कोणताही ऑडिओ नसला तरी अनेक वापरकर्त्यांनी असे म्हटले आहे की, संभाषणादरम्यान नील स्पष्टपणे रागावला होता. व्हिडीओवर युजर्स विविध कमेंट्सदेखील करीत आहेत.
एका वापरकर्त्याने कमेंट केली, “नील नितीन मुकेश अनुष्का सेनवर रागावला आहे का?”. दुसऱ्याने लिहिले, “काहीतरी मोठे घडले आहे”. काही जण म्हणाले, “नील खूप सुंदर व्यक्ती आहे; पण त्याला अचानक काय झाले”.
आतापर्यंत नील किंवा अनुष्काने या व्हिडीओबाबत कोणतेही विधान केलेले नाही. लोकांचा कदाचित गैरसमज झाला असावा. पण, या क्लिपने इंटरनेटवर निश्चितच सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कार्यक्रमानंतर नीलने इन्स्टा स्टोरीवर एक फोटोही शेअर केला, ज्यामध्ये अनुष्का सेन दिसत आहे.
नील सध्या ‘है जुनून’च्या रिलीजची तयारी करीत आहे. हा एक यूथ सेंट्रिक म्युझिकल ड्रामा आहे. जॅकलिन नीलबरोबर या शोमध्ये डिजिटल डेब्यू करण्यास सज्ज आहे. ही सीरिज शुक्रवारी (१६ मे) जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.