सेलिब्रिटींचे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी अनेक गोष्टी करतात. कधी त्यांच्यासाठी काही भेट पाठवतात, कधी त्यांच्या आवडत्या फोटोंचा व्हिडीओ तयार करतात, तर कधी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या सेटवर जातात. असचं काही तरी अभिनेत्री जान्हवी कपूर सोबत झालं आहे. जान्हवीचा एक चाहता तिला भेटण्यासाठी राजस्थानहून मुंबईला आला होता. मात्र, जान्हवीने त्याला चांगली वागणूक दिली नाही असं म्हणतं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

जान्हवीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. वर्कआउट केल्यानंतर जान्हवी पायलेट्स स्टुडिओमधून बाहेर आली. गेटच्या बाहेर तिचा एक चाहता असल्याचे तिने पाहिले. जान्हवीने त्या चाहत्याला पाहताच त्याला भेटण्यासाठी पुढे आली. त्याच्या हातात एक मोठी भेट वस्तू होती. जान्हवीने विनंती केल्यानंतर सिक्युरिटी गार्डने त्याला आत येऊ दिले. त्यानंतर जान्हवीने त्याच्यासोबत एक फोटो काढला. इतकेच नाही तर जान्हवीने ती भेट स्वीकारली आणि त्यानंतर ती गाडीकडे गेली. तिचा हा चाहता राजस्थानवरून मुंबईला तिला भेटायला आला होता. जरी ही सगळं सामान्य होतं पण जान्हवी ज्या प्रकारे त्या चाहत्याशी वागली त्यामुळे ती ट्रोल झाली आहे.

आणखी वाचा : गर्भवती असताना पार्टी केल्यामुळे नुसरत जहां झाल्या ट्रोल; नेटकरी म्हणाले…

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. जान्हवीने तिच्या चाहत्याला अॅटिट्यूड दाखवला आणि त्याने दिलेल गिफ्ट उचललं नाही म्हणतं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘आताच एवढा अॅटिट्यूड आहे, पुढे जाऊन काय होईल’. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘शिकलेले असभ्य लोक.’

janhvi kapoor got trolled
चाहत्याला चांगली वागणूक न दिल्याने जान्हवी झाली ट्रोल

आणखी वाचा : #BoycottToofaan : प्रदर्शनापूर्वीच ‘तूफान’ वादात; जाणून घ्या काय आहे कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जान्हवी लवकरच ‘दोस्ताना 2’, ‘गुड लक जेरी’, ‘तख्त’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे. जान्हवीचा ‘रुही’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा देखील होते. या चित्रपटातील जान्हवीची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तर नेटकऱ्यांनी जान्हवीच्या अभिनयाचे कौतुक केले.