बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर १४ एप्रिलला मुंबईमध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर आलियानं आपल्या विवाहसोहळ्याचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंची सर्वत्र चर्चा सुरु आहे. रणबीर कपूरच्या लग्नानंतर त्याची आई नीतू कपूर यांनी नव्या सूनेबद्दल दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नीतू कपूर यांनी रणबीरच्या लग्नापूर्वी डान्स दिवाने या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून हजेरी लावली. याचा एक प्रोमो नुकतंच समोर आला आहे. यात नीतू कपूर या आलियाबद्दल भाष्य करताना दिसत आहे. यावेळी अनेकजण नीतू कपूर यांची सासू होण्यावर खिल्ली उडवताना दिसत आहेत.

या कार्यक्रमाचा होस्ट करण कुंद्रा हा म्हणतो की सासू तर होणारच आहे, कारण लवकरच त्यांची सून घरी येणार आहे. यानंतर करण जौहर विचारतो, ‘घरी सर्वात जास्त कोणाची मर्जी चालते? सासूची की सूनेची’. त्यावर नीतू कपूर म्हणतात, “फक्त सूनेचीच….” आणि ‘मला वाटतं की फक्त सूनेचीच चालावी.’ नीतू कपूर यांचे हे उत्तर ऐकून सर्वजण आश्चर्यचकित होतात.

दरम्यान आलिया आणि रणबीर कपूर १४ एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या या विवाहसोहळ्याला दोघांचेही कुटुंबीय, काही मोजके नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. लग्नाच्या सर्व विधी पंजाबी रिती रिवाजाप्रमाणे पार पडल्या. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. आलियाने शेअर केलेल्या लग्नाच्या या फोटोंवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

प्रियांका चोप्राने दिल्या रणबीर-आलियाला लग्नाच्या शुभेच्छा, पोस्ट शेअर करत म्हणाली “तुमचे प्रेम…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलिया आणि रणबीरचा हळदी आणि मेहंदी समारंभ ‘वास्तू’मध्येच पूर्ण विधींसह पार पडला आहे. यावेळी संपूर्ण कपूर आणि भट्ट कुटुंबाने हजेरी लावली होती. यासोबत आलिया आणि रणबीरच्या जवळच्या मित्रांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी करण जोहर, श्वेता बच्चन यांनी यावेळी हजेरी लावली होती. रणबीरच्या लग्नाची वरात कृष्णराज बंगल्यातून निघणार आहे. त्यानंतर वांद्र्यातील वास्तू या ठिकाणी ते दोघेही सप्तपदी घेतील.