‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून नावारुपास आलेली अभिनेत्री दिशा वकानी उर्फ दया बेन मालिकेत पुन्हा कधी परतणार? हा प्रश्न चाहते सातत्याने विचारत आहेत. लग्नाच्या निमित्ताने मालिकेतून ब्रेक घेणारी दिशा अडिच वर्षानंतरही परतलेली नाही. या पार्श्वभूमीवर मालिकेत आता नव्या अभिनेत्रीची दया बेन म्हणून निवड केली जावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान दया बेनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा गंमतीशीर व्हिडीओ पाहून हिच नवी दया बेन आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये अभिनेता रोहित आसरा दया बेनची नक्कल करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो हुबेबुब दिशा वकानीसारखा अभिनय करत आहे. त्याचा हा अनोखा अभिनय पाहून याचीच दयाबेन म्हणून निवड करावी असा गंमतीशीर सल्ला चाहते निर्मात्यांना देत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील हसून हसून लोटपोट व्हाल.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक आहे. २८ जुलै २००८ रोजी या मालिकेचा पहिला भाग टीव्हीवर प्रसारीत झाला झाला होता. तेव्हापासून तब्बल १२ वर्ष ही मालिका सातत्याने लोकांना हसवत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचं फॅन फॉलोईंग आज कुठल्याही बॉलिवूड कलाकारापेक्षा कमी नाही. यावरुनच ‘तारक मेहता’ मालिकेच्या लोकप्रियता अंदाज आपल्याला येतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New dayaben taarak mehta ka ooltah chashmah viral video mppg
First published on: 13-12-2020 at 10:45 IST