‘सुर्यवंशी’चं नवं पोस्टर प्रदर्शित, चाहत्यांना दिला ‘हा’ खास मेसेज

‘सुर्यवंशी’चे हे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

sooryavanshi, akshay kumar,
'सुर्यवंशी'चे हे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’ अद्याप प्रदर्शित झालेला नाही. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. जवळपास वर्षभरापासून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबलेले आहे. आता हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे. संपूर्ण टीम ही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये लागली आहे. दरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटाचा आणखी एक पोस्टर प्रदर्शित केले आहे.

चित्रपटाचे हे नवीन पोस्टर चित्रपट समिक्षक तरन आदर्श यांनी शेअर केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या पोस्टमध्ये अक्षय दिसत आहे. या पोस्टरवर लिहिले आहे की “या दिवाळीला तुमच्या संपूर्ण कुटुंबाला चित्रपटगृहात घेऊन या.” या आधी रणवीर सिंग, अजय देवगन आणि अक्षय कुमारचं आयला रे आयला हे गाणं प्रदर्शित झालं होतं. हे गाणं अक्षयच्या खट्टा मिठा या चित्रपटातील आहे.

आणखी वाचा : “एक आई आपल्या मुलाला…”, मलायकासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे अर्जुन झाला ट्रोल

आणखी वाचा : Omg2 : अक्षयचा जटाधारी लूक पाहिलात का? पंकज त्रिपाठीसोबतचा व्हिडीओ व्हायरल

हा चित्रपट आधी २४ मार्च २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनाचा वाढता संसर्ग आणि नियमांना पाहता चित्रपट प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रणवीर सिंग आणि अजय देवगनने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New poster of the sooryavanshi movie come out today with new slogan dcp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!