अनन्या-आर्यनमधील नवे WhasApp Chat आले समोर; आर्यनने विचारलेलं, “तू वीड…”

आर्यन खानच्या मोबाईलमधील नवे चॅट समोर आले आहे.

New WhatsApp chat, Aryan khan, Aryan khan drugs plan, Aryan khan drugs, Aryan khan whats app chat, Whats app chat,

क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी शाहरुख खान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, आर्यन खानच्या मोबाईलमधील एक नवे चॅट समोर आले आहे. या चॅटमध्ये आर्यन आणि अनन्या पांडे अमली पदार्थांच्या खरेदी विषयी बोलताना दिसत आहे.

‘इंडिया टूडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानच्या मोबाईलमधील नवे चॅट समोर आले आहे. या चॅटमध्ये तो दोन व्यक्तींशी कोकेन विषयी बोलत आहे. दुसऱ्या एका चॅटमध्ये आर्यन खान आणि अनन्या पांडे वीड विषयी बोलत आहेत. या चॅटच्या आधारे अनन्याला एनसीबीने चौकशीसाठी बोलावले होते. एका चॅटमध्ये आर्यन खान अनन्याला ‘तू वीड आणलीस का?’ असे विचारत होता. त्यावर अनन्याने ‘मी आणते आहे’ असे उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : तुरुंगामधील टॉयलेट वापरावं लागू नये म्हणून…; आर्यन खानमुळे तुरुंग कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलं

ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर आर्यन खान मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये गजाआड आहे. आर्यन केसवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी मुंबई सत्र न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळत त्याला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर शाहरुख खान आणि आर्यन खानचे वकील आर्यनला लवकरात लवकर जामीन मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र पुढील तीन दिवसात म्हणजेच २९ ऑक्टोबर पर्यंत जर न्यायालयाने जामीन अर्जावर कोणताही निर्णय दिला नाही तर आर्यनला १५ नोव्हेंबर पर्यंत जेलमध्येच राहवं लागू शकतं.

जर आर्यन खानच्या जामीन अर्जावर येत्या तीन दिवसात निकाल जाहीर झाला नाही तर त्याला यंदाची दिवाळी कारावासातच साजरी करावी लागणार आहे. आर्यन खानला दिवाळीसाठी घरी जाता येणार नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: New whatsapp chats show aryan khan discussing cocaine plan mocking ncb avb