बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)  आणि अमेरिकी सिंगर निक जोनस (Nick Jonas)  यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. प्रियांका आणि निक नुकतेच आई-वडील झाले आहेत. प्रियांका आणि निक दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. निक सध्या एका डान्स रिअॅलिटी शोचा परिक्षक आहे. तर नुकतीच निकने एका मुलाखतीत बॉलिवूड गाणं आणि डान्सवर असलेल्या त्याच्या प्रेमाविषयी सांगितले आहे.

आणखी वाचा : “अचानक १५० लोक मध्येच घुसले आणि…”, शरद पोंक्षेनी सांगितला होता ‘मी नथुराम गोडसे…’ नाटकाच्या प्रयोगाचा तो थरारक प्रसंग

निकने ‘द जिमी फॉलन’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी चर्चा करत असताना म्हणाला, “माझी पत्नी भारतीय आहे. आम्ही अनेक बॉलिवूड गाण्यांवर नाचतो. बॉलिवूड गाण्यांवर डान्स करणं सगळ्यात सोपं आहे असं मला वाटतं कारण तिथे फक्त मला ही स्टेप करावी लागते. मी बसलो असेन किंवा उभा असेन काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त ही एकच स्टेप करायची असते”, असं निक म्हणाला.

आणखी वाचा : “विकीच्या जागी कोणी दुसरा असता…”, सुशांतच्या मृत्युनंतर आलेल्या अनुभवावर अंकिता झाली व्यक्त

आणखी वाचा : “मी सलमान खानला कधीच घेतल नसतं कारण…”, ‘मुळशी पॅटर्न’च्या हिंदी रिमेकवर प्रवीण तरडेंच वक्तव्य चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निकने बॉलिवूडमधील गाण्यांवर प्रेम व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी महिनाभर आधी इन्स्टाग्राम लाइव्ह दरम्यान, त्याचं आवडतं बॉलिवूड गाणं हे बॉम डिग्गी डिग्गी आहे, असं सांगितलं आहे. प्रियांका चोप्रा अॅमेझॉन प्राइम सीरीज ‘सिटाडेल’साठी शूटिंग करत आहे.