सध्या फिफा विश्वचषक २०२२ची सगळीकडेच चर्चा आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी फिफा सोहळ्याला हजेरी लावली होती. आता बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा फिफा वर्ल्ड कपमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. नोराने फिफा वर्ल्ड कपमध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकवल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत जरी असला तरी काही नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खटकला आहे.

आपल्या गाण्यांमधून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या नोराने फिफा वर्ल्ड कपच्या फॅनफेस्ट इव्हेंटमध्येही डान्सने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नोराने तिच्या तालावर चाहत्यांनाही ठेका धरायला भाग पाडलं. तिचा डान्स सगळ्यांना आवडला मात्र डान्सच्या शेवटी जे घडले त्यावरून नेटकरी भडकले आहेत. डान्स संपल्यावर मागे डान्स करणारा एक कलाकार येऊन तिला विचित्रपद्धतीने स्पर्श करतो. या त्याच्या कृतिवर काही प्रेक्षक नाराज झाले आहेत. तर एकाने त्याची बाजू घेत त्याने प्रतिक्रिया दिली कि ‘कदाचित तो तिचा ड्रेस ठीक करत असेल’.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehism)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डान्स सादर केल्यानंतर नोराने मंचावर भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावला. यावेळी तिने ‘जय हिंद’ अशा घोषणाही दिल्या. नोरा सध्या कलर्स टीव्हीवरील ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे. नोरा मूळची कॅनडाची आहे.