प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं ३१ मे मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कोलकाता येथे आकस्मिक निधन झालं. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. वयाच्या ५३ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. दिवंगत अभिनेते ओम पुरी यांची पूर्वाश्रमीची पत्नी नंदिता पुरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नंदिता यांनी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

नंदिता यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. “पश्चिम बंगालला लाज वाटायला हवी. कोलकाता प्रशासनाने केकेची हत्या केली आणि आता पश्चिम बंगाल सरकार यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतेय. कॉन्सर्टमध्ये कोणतीही दक्षता घेतली गेली नव्हती. अडीच हजार क्षमता असलेल्या नजरूल मंच या ऑडिरोटीयममध्ये जिथे २ हजार ५०० लोकांची जागा होती तिथे ७ हजार लोक होते. एसी काम करत नव्हते. केके घामाघुम झाला होता. ४ वेळा तक्रार करूनही त्याचं कोणीही ऐकलं नाही. ना औषधं होती, ना प्राथमिक उपचाराची सोय होती, याची सीबीआय चौकशी व्हायला हवी. तोपर्यंत बॉलिवूडने पश्चिम बंगालमध्ये परफॉर्म न करता बायकॉट केलं पाहिजे,” अशा आशयाची पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

आणखी वाचा : कोणत्या मराठी अभिनेत्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आवडली? सचिन खेडेकर म्हणाले…

आणखी वाचा : सोनाक्षी सिन्हाला रामायणावरील या सोप्या प्रश्नाचं उत्तर देता आले नाही, बिग बी म्हणाले…

पुढे त्या म्हणाल्या, “त्यांना कोलकाता यामागचे कारण आहे किंवा कोलकाता पोलिस आणि तिथल्या लोकांना दोषी ठरवायचे नाही. त्यांना फक्त सरकार आणि प्रशासन यांचं गैरव्यवस्थापन आणि विशेषत: नजरल मंचाची मॅनेजमेंट सांभाळणाऱ्या लोकांना दोष देण्याचा माझा हेतू होता.”

आणखी वाचा : “तुझं सर्वात Best Reel…”, जिनिलियाचा शक्ती कपूर यांच्यासोबत धमाल डान्स व्हिडीओवर रितेशची कमेंट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर काही वेळातच केके त्याच्या टीमसोबत हॉटेलकडे रवाना झाला. ईटाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळातच केकेने छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला सीएमआरआय रुग्णालयात नेण्यात आले. जे हॉटेलपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर होते. तेथे डॉक्टरांनी केकेला मृत घोषित केले. सध्या त्याच्या कॉन्सर्टचा एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे.