‘ओपनहायमर’ चित्रपटाने पहिले तीन दिवस भारतात चांगली कमाई केली, पण चौथ्या दिवशी मात्र यात घट झाली आहे. या चित्रपटाचा मुख्य अभिनेता सेक्स सीनदरम्यान भगवद्गीतेचं वाचन करताना दाखवण्यात आला आहे. त्यामुळे भारतातील प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या सीनवरून वाद सुरू आहे, त्यामुळे चित्रपटाच्या कमाईला फटका बसल्याचं म्हटलं जात आहे.

‘ओपनहायमर’मध्ये सेक्स करताना भगवद्गीतेचं वाचन, सीनचं ‘महाभारता’तील श्रीकृष्णाने केलं समर्थन; म्हणाले, “आजची परिस्थिती…”

‘सॅकनिल्कच्या रिपोर्ट’नुसार, सुरुवातीच्या अंदाजानुसार ओपनहायमरने चौथ्या दिवशी भारतात सर्व भाषांमध्ये ७ कोटी रुपयांची कमाई केली जी आधीच्या तीन दिवसांच्या तुलनेत खूपच कमी आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी १४.५ कोटी, दुसऱ्या दिवशी १७ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १७.२५ कोटी कमावले होते. पण चौथ्या दिवशी मात्र कमाईत मोठी घट झाली आहे. चित्रपटाने एकूण ५५.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘ओपनहायमर’मधील सेक्स करताना भगवद्गीता वाचण्याचा सीन हटवणार; मंत्री अनुराग ठाकूर यांनी सेन्सॉर बोर्डला खडसावले

‘ओपनहायमर’बरोबरच बार्बी चित्रपटही रिलीज झाला आहे, तसेच ‘ओपनहायमर’मधील एका सीनवरून वाद झाला आहे, या गोष्टींचा फटका चित्रपटाला बसल्याची चर्चा होत आहे. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित या चित्रपटात सिलियन मर्फीने ओपेनहायमरची भूमिका साकारली आहे. त्याशिवाय यामध्ये फ्लोरेन्स पग, एमिली ब्लंट, रॉबर्ट डाउनी ज्युनियर, मॅट डॅमन, जोश हार्टनेट, केसी ऍफ्लेक, रामी मलिक आणि केनेथ ब्रानाघ यांच्याही भूमिका आहेत.