‘आरआरआर’ या सिनेमाने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. हा सिनेमा प्रदर्शित होवून नुकतेच शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेर कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये ‘आरआरआर’ या सिनेमाने मोठा गल्ला जमवला आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या सिनेमाबद्दल मात्र ऑस्कर विजेते रेसुल पुकुट्टी यांनी केलेली एक कमेंट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

साऊंड डिझायनर रेसुल पुकुट्टी यांनी ट्विटरवर ‘आरआरआर’ सिनेमाबद्दल एक कमेंट केलीय ज्यात त्यांनी आलिया भट्टचाही उल्लेख केलाय. ‘आरआरआर’ हा सिनेमा गे लव्हस्टोरी असल्याचं ते म्हणाले आहेत. रेसुल यांच्या पोस्टवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. लेखक दिग्दर्शक मुनिष भारद्वाज यांनी ‘आरआरआर’ सिनेमा पाहिल्यानंतर एक ट्वीट केलं. “काल तीस मिनिटं ‘आरआरआर’ नावाचा कचरा पाहिला” असं टीकात्मक ट्वीट मुनिष भारद्वाज यांनी केलंय. त्यांच्या या ट्वीटवर ऑस्कर विजेते साऊंड डिझायनर रेसुल पुकुट्टी यांनी कमेंट केलीय. मुनिष भारद्वाज यांचं ट्वीट आणि रेसुल पुकुट्टी यांच्या कमेंटवर नेटकऱ्यांनी टीका केलीय.

‘आरआरआर’ सिनेमात अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत तर आलिया भट्ट देखील महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे. दरम्यान, मुनिष भारद्वाज यांच्या पोस्टवर कमेंट करत रेसुल पुकुट्टी म्हणाले ” आरआरआर सिनेमा ही एक गे लव्ह स्टोरी आहे.” तर आणखी एका कमेंटमध्ये ते म्हणाले “आलिया भट्ट तर सिनेमात दिखाव्यापुरती होती.”


रेसुल यांच्या या कमेंटवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. आस्कर विजेत्या व्यक्तीने अशाप्रकारची पोस्ट करणं शोभत नसल्याच नेटकरी म्हणाले आहेत. “ऑस्कर पुरस्कृत व्यक्तीने इतक्या खालच्या पातळीची कमेंट करणं शोभत नाही” असं म्हणत काही नेटकऱ्यांनी रेसुल यांच्यावर टीका केलीय.

रेसुल पुकुट्टी यांनी ब्लॅक, सावरिया,रावन, पुष्पा: द राइज आणि राधे श्याम यांसारख्या सिनेमांसाठी साऊंड डिझाईन केलंय. तर २००९ सालामध्ये आलेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या सिनेमासाठी त्यांना बेस्ट साऊंड मिक्सिंग या श्रेणीसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आरआरआर’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केलीय. ३०० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाने जवळपास १२०० कोटींचा गल्ला कमावलाय. या सिनेमात राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते. तर अजय देवगणही एका खास भूमिकेत झळकला होता.