जर तुम्हाला मनोरंजनाची आवड असेल तर मे २०२५ हा महिना तुमच्यासाठी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आणि वेब सीरिज घेऊन येत आहे. या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्शन, कॉमेडी, थ्रिलर, ड्रामा अशा अनेक उत्तम गोष्टी प्रदर्शित होणार आहेत. तर चला मग, आम्ही तुम्हाला १ मे ते ३१ मेपर्यंत वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणारे चित्रपट आणि सीरिजबद्दल सांगतो. यामध्ये सलमान खानचा ‘सिकंदर’ ते जॉनचा ‘द डिप्लोमॅट’ यांचा समावेश आहे.

कोस्टाओ

नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत ‘कोस्टाओ’ हा एक बायोग्राफिकल ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये तो कोस्टाओ फर्नांडिसची भूमिका साकारत आहे. ९० च्या दशकात कोस्टाओ गोव्यात एक प्रामाणिक कस्टम अधिकारी होते. ‘कोस्टाओ’ला सोन्याच्या तस्करीबद्दल माहिती कशी मिळते हे या चित्रपटात दाखवले आहे. हा चित्रपट १ मे रोजी Zee5 वर प्रदर्शित झाला आहे.

ब्लॅक, व्हाईट अँड ग्रे

‘ब्लॅक व्हाइट अँड ग्रे’ ही एक सीरिज आहे, ज्यामध्ये पत्रकार डॅनियल गॅरी यांच्याबद्दल दाखवलं गेलं आहे. ही सीरिज २ मे रोजी सोनी लिव्हवरदेखील आली आहे.

कुल

अमोल पराशर, निमरत कौर आणि रिद्धी डोगरा स्टारर ‘कुल’ ही सीरिज दोन कुटुंबांमधील सत्तासंघर्ष दाखवते. या सीरिजमध्ये निमरत इंदिरा राणी यांची भूमिका साकारत आहे आणि ही सीरिज २ मे रोजी प्रदर्शित झाली आहे, जी जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.

गुड बॅड अग्ली

अजित कुमार स्टारर ‘गुड बॅड अग्ली’ हा चित्रपट २०२५ मध्येच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता आणि आता हा चित्रपट ८ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर येत आहे.

ग्राम चिकित्सालय

पंचायत सीरिजनंतर आता त्याचे निर्माते ‘ग्राम चिकित्सालय’ नावाची आणखी एक सीरिज घेऊन येत आहेत, यामध्येही लोकांना गावाची कहाणी पाहायला मिळेल. ही सीरिज ९ मे रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

द डिप्लोमॅट

जॉन अब्राहमचा ‘द डिप्लोमॅट’ हा चित्रपट २००७ सालच्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नसला तरी लोकांना तो खूप आवडला आणि जॉनच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. अशा परिस्थितीत जर तुम्ही तो थिएटरमध्ये पाहिला नसेल तर आता तुम्ही तो ९ मे रोजी नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

सिकंदर

सलमान खान आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘सिकंदर’ हा चित्रपट थिएटरनंतर आता ओटीटीवर येणार आहे. हा चित्रपट ३० मे रोजी ओटीटीवर प्रदर्शित होईल.

क्रिमिनल जस्टिस सीझन ४

तीन यशस्वी सीझननंतर आता पंकज त्रिपाठी स्टारर सीरिज ‘क्रिमिनल जस्टिस सीझन ४’ प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज २२ मे रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

है जुनून

‘है जुनून’मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये सर्व विद्यार्थी ट्रॉफीसाठी आपापसात लढताना दिसतील. यात जॅकलिन फर्नांडिस आणि नील नितीन मुकेश यांच्या भूमिका आहेत आणि तो १६ मे रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.