Ott Release This Week : ओटीटीवर मागच्या आठवड्यात अनेक उत्तम चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित झाल्या. आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातही काही बहुचर्चित व बहुप्रतीक्षित कलाकृती रिलीज होणार आहेत. या आठवड्यात ओटीटीवर अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि सीरिज तुमचं मनोरंजन करण्यासाठी प्रदर्शित होणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला ॲक्शन, हॉरर, कॉमेडी, थ्रिलर यांसह इतरही जॉनर पाहायला मिळतील.
ऑगस्टचा दुसरा आठवडा म्हणजेच ११ ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान कोणते नवीन चित्रपट आणि सीरिज विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत ते जाणून घेऊयात.
सारे जहाँ से अच्छा
प्रतीक गांधी स्टारर हा चित्रपट १३ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. चित्रपटाची कथा भारतीय गुप्तहेर विष्णू शंकर आणि आयएसआय एजंट मूर्तझा मलिक यांच्याभोवती फिरते. स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही हा चित्रपट अवश्य पाहावा.
तेहरान
जॉन अब्राहम, नीरू बाजवा व मानुषी छिल्लर स्टारर ‘तेहरान’ हा चित्रपट १४ ऑगस्टपासून Zee5 वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा २०१२ मध्ये दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटांवर आधारित आहे.
अंधेरा
या हॉरर सीरिजमध्ये प्राजक्ता कोळी, सुरवीन चावला, प्रिया बापट व करणवीर मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सीरिजमध्ये तुम्हाला इतके ट्विस्ट पाहायला मिळतील की तुमचे डोके चक्रावून जाईल. तुम्ही ते १४ ऑगस्टपासून प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
कोर्ट कचेरी
हा कोर्टरूम ड्रामा १३ ऑगस्ट रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. त्यात आशीष वर्मा आणि पवन मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजची कथा इतकी चांगली आहे की, तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडेल.
माँ
काजोलचा सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर चित्रपट ‘माँ’ १५ ऑगस्टपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड करू शकला नाही; परंतु त्याचा निर्मिती खर्च वसूल करण्यात तो यशस्वी झाला.
नाईट ऑलवेज कम्स
हा क्राइम ड्रामा १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री तिच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्वकाही पणाला लावते.
फिक्स्ड
‘फिक्स्ड’ हा कॉमेडी चित्रपट १३ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा कंटेंट इतका चांगला आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्हाला खूप हसायला येईल.
लव्ह इज ब्लाइंड सीझन २
‘लव्ह इज ब्लाइंड’चा दुसरा सीझन १३ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये जेसिका बॅटन, निक लाची, लॉरेन स्पीड, झनब जाफरी व कोल बार्नेट हे प्रमुख भूमिकेत आहेत.