२०२२ हे वर्षं संपत आलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीसाठी हे यंदाचं वर्षं तितकं लाभदायी ठरलेलं नसून यावर्षीही दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बाजी मारून नेली आहे. कोविडनंतर सर्वात जास्त बघितल्या जाणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरसुद्धा यावेळी कोणत्याच भारतीय वेबसिरीजचा बोलबाला नव्हता. यंदाचं वर्षं ओटीटीसाठीही तितकं लाभदायी नसलं तरी ओटीटी विश्वातील या काही वेबसिरीजची जोरदार चर्चा होती. प्रेक्षकांनी यांना डोक्यावर घेतलं. याच काही वेबसीरिजचा आपण आढावा घेणार आहोत.

१. हाऊस ऑफ द ड्रॅगन :
‘गेम ऑफ थ्रोन्स’चा शेवटचा सीझन जसा संपला तेव्हापासूनच्या या प्रीक्वलची चर्चा सुरू झाली होती. अखेर यावर्षी त्याचा म्हणजेच ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’चा पहिला सीझन प्रदर्शित झाला आणि चाहत्यांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. पहिल्या सीरिजप्रमाणेच या सीरिजसाठीही चाहते चांगलेच उत्सुक होते. शिवाय यामध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या १००० वर्षांपूर्वीची गोष्ट आणि सत्तासंघर्ष उलगाडताना पाहायला मिळणार आहे. याचा पहिला सीझन संपला असून चाहते याच्या पुढच्या सीझनची फार आतुरतेने वाट पाहत आहेत.

२. द रिंग ऑफ पॉवर्स :
‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’ या युनिव्हर्सशी निगडीत ही सिरिज यावर्षीची सर्वात जास्त पाहिली गेलेली वेबसीरिज आहे. या सीरिजमध्येदेखील ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’प्रमाणे भव्य कथानक मांडण्यात आलं.

३. कॉफी विथ करण सीझन ७ :
यावर्षीचा ‘कॉफी विथ करण सीझन ७’ हा केवळ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित झाला. या सीझनमध्ये यावेळी बऱ्याच नव्या चेहऱ्यांनी हजेरी लावली. नेहमीप्रमाणेच बॉलिवूड गॉसिप आणि आपल्या लाडक्या स्टार्सच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी या शोच्या चाहत्यांनी हा नवा सीझनही चांगलाच डोक्यावर घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४. डॅहमर – मॉनस्टर जेफ्री डॅहमर स्टोरी :
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजची यावर्षी चांगलीच हवा होती. तरुण मुलांना घरी घेऊन त्यांना बेशुद्ध करून, त्यांचा खून करून त्यांचे अवयव खाणारा सैतान जेफ्री डॅहमरच्या कुकर्मावर बेतलेली ही सीरिज बऱ्याच लोकांनी आवडीने पाहिली. नेटफ्लिक्सवर यावर्षी पाहिली गेलेल्या सीरिजमध्ये या वेबसीरिजचं नाव सर्वात वर आहे.