scorecardresearch

“नव्वदच्या दशकात सेटवर पुरुषांची… ” अभिनेत्री जुही चावलाने केला खुलासा

कदाचित माझा असा संवाद पुरुष दिग्दर्शकाबरोबर नसता झाला.

“नव्वदच्या दशकात सेटवर पुरुषांची… ” अभिनेत्री जुही चावलाने केला खुलासा
bollywood actress

नव्वदच्या दशकात बॉलिवूड चित्रपटात काम करण्यासाठी अनेक कलाकार आले होते. सत्तर ऐंशीच्या दशकात अमिताभ बच्चन यांनी संपूर्ण बॉलिवूडवर राज्य केले होते. नव्वदच्या दशकात आमिर, शाहरूख, सलमान, अक्षय कुमार, अजय देवगण यांसारखे अभिनेते एकमेकांना टक्कर देत होते. याच काळात अनेक अभिनेत्रींनी आपली छाप सोडली होती. माधुरी दीक्षित, रविना टंडन, करिश्मा कपूर, मनीषा कोईराला, सोनाली बेंद्रे या अभिनेत्री गाजत होत्या. अभिनेत्री जुही चावला ने आमिरबरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने नव्वदच्या दशकाबद्दल आपले मत मांडले आहे.

अभिनेत्री जुही चावला सध्या चर्चेत आहे. तिची ‘हश हश’ ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजच्या निमित्ताने तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला, ती अस म्हणाली नव्वदच्या दशकात चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्यांची मक्तेदारी असायची. सेटवर पुरुषांची संख्या जास्त असायची. त्याकाळात अभिनेत्रींबरोबर त्यांची आई, हेअर स्टायलिस्ट इतक्याच महिला असायच्या. परंतु आता चित्र बदलेले आहे. आज या क्षेत्रात ५० टक्के महिला आहेत. न्युज १८ ला दिलेल्या मुलाखतीत तिने हे स्पष्टीकरण दिले आहे.

Bigg Boss 16 : साजिद खानला पाठिंबा दिल्याने अभिनेत्री कश्मिरा शाह झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले, “तुझ्याइतकी ढोंगी… “

ओटीटी माध्यम विषयी बोलताना जुही म्हणाली, ‘या सीरिजच्या दिग्दर्शिका तनुजा चंद्रा यांच्याशी मी विविध विषयांवर चर्चा करायचे’. त्यांच्याकडून माहिती घ्यायचे. कदाचित माझा असा संवाद पुरुष दिग्दर्शकाबरोबर नसता झाला. या माध्यमात काम करण्याचा अनुभव वेगळा होता. या माध्यमातून अभिनेत्रींनी आव्हानात्मक भुमिका करायचा मिळतील.

जुहीच्या बरोबरीने आयेशा झुलका, सोहा अली खान या अभिनेत्री या सीरिजमधून ओटीटीविश्वात पदार्पण करत आहेत. तर करिश्मा तन्ना, शहाना गोस्वामी, कृतिका कामरा या अभिनेत्रीही यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही वेबसिरीज सस्पेन्स थ्रिलर आहे. तनुजा चंद्रा, कोपल नैथानी, आशिष पांडे यांनी वेबसिरीज दिग्दर्शित केली आहे

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या