ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर चाहत्यांची उस्तुकता वाढली आहे. ‘आदिपुरुष’ मधील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान मुख्य भूमिकेत असलेला आदिपुरुष सिनेमा येत्या १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘आदिपुरुष’ सिनेमागृहात प्रदर्शित होण्याआधीच त्याच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत माहिती समोर आली आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर ५० दिवसांनी ‘आदिपुरुष’ सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी करारही केला आहे.

हेही वाचा>> एकनाथ शिंदेंच्या बंडावर नारायण राणेंनी केलं भाष्य, म्हणाले, “मी शिवसेनेत असतो तर…”

मीडिया रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’ सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. यासाठी २५० कोटींचा करार झाल्याची माहिती आहे. या चित्रपटाने म्युझिक, सॅटेलाइट आणि इतर डिजिटल राइट्सच्या विक्रीद्वारे ४३२ कोटींची कमाई केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास श्रीराम तर क्रिती सेनॉन सिता मातेच्या भूमिकेत आहे. सैफ अली खानने या चित्रपटात रावणाची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे.