अमृता खानविलकर व अमेय वाघ यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. १८ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. व्लॉगरच्या रहस्यमय आणि धक्कादायक जगातील कथा सांगणारा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट आता घसबसल्या पाहता येणार आहे.

‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, आणि विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात व्लॉगरच्या आयुष्यातील गूढ आणि धक्कादायक घटनेचा थरार दाखवला आहे, जो प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवतो.

हेही वाचा – ‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी

like aani subscribe on OTT
‘लाईक आणि सबस्क्राईब’ ओटीटीवर

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. “प्रेक्षक आता ‘लाईक आणि सबस्क्राईब’ प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. या चित्रपटातून व्लॉगरच्या आयुष्यातील रहस्य आणि थरार पाहाणे प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरेल,” असं चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्माते नितीन प्रकाश वैद्य म्हणाले, “आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांसाठी प्राईम व्हिडीओवर उपलब्ध केला आहे. या रहस्यमय कथेचा आता घरबसल्या आनंद घेता येईल.”