अमृता खानविलकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘झी सिनेस्टार की खोज’ या कार्यक्रमातून २००४ मध्ये तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. यानंतर २००६ मध्ये अमृताने ‘गोलमाल’ हा तिचा पहिला चित्रपट केला. या चित्रपटामुळे अभिनेत्रीला घराघरांत लोकप्रियता मिळाली. गेल्या काही वर्षांत अमृताने मराठीसह बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

अमृताला २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राझी’ चित्रपटातून बॉलीवूडची स्टार अभिनेत्री आलिया भट्टबरोबर स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली होती. यानंतर तिने काही ओटीटी सीरिजमध्ये काम केलं याशिवाय अनेक मराठी चित्रपट देखील केले. आता अमृता पुन्हा एकदा हिंदी सीरिजमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवण्यास सज्ज झाली आहे.

हेही वाचा : Video: नुपूर शिखरेला लग्नात शॉर्ट्स अन् बनियनवर पाहून आयरा खान म्हणाली, “Good Bye…”

‘व्हिडीओ कॅम स्कॅम’ या थ्रिलर ड्रामा असलेल्या सीरिजमध्ये अमृता खानविलकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हनीट्रॅप, ऑनलाइन फसवणूक या विषयावर या सीरिजचं कथानक आधारलेलं आहे. अमृताबरोबर या सीरिजमध्ये अभिनेता रजनीश दुग्गल प्रमुख भूमिका साकारणार आहे. ही सीरिज १२ जानेवारीपासून एपिक ऑनवर प्रसारित करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Video: आशा भोसलेंच्या नातीला पाहिलंत का? दिसते खूपच सुंदर; जनाईचा आजीबरोबरचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमृता खानविलकरने या सीरिजमधील तिच्या लूकची पहिली झलक व ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘व्हिडीओ कॅम स्कॅम’ या सीरिजनंतर लवकरच अमृता ‘कलावती’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.