Rise And Fall या रिअ‍ॅलिटी शोचा अंतिम टप्पा जसजसा जवळ येत आहे, तसतशी स्पर्धा अधिकच रंगतदार होत आहे. शोमध्ये रोज येणारे नवनवीन ट्विस्ट्स, दिवसागणिक बदलत जाणारे खेळाचे नियम आणि स्पर्धकांच्या वादामुळे हा शो सतत चर्चेत आहे. या शोमध्ये ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व गाजवलेल्या अरबाज पटेलनेही सहभाग घेतला आहे. उत्तम खेळ खेळत तो आता शोच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

Rise And Fall शोच्या फायनलसाठीचं टिकीट जिंकून अरबाज पटेलनं पहिला फायनलिस्ट होण्याचा मान पटकावला आहे. या भागाची सुरुवात झाली एका धक्कादायक टास्कने. या टाकमध्ये Rulers ना आपल्या गटातीलच सर्वात कमजोर सदस्याला Ultimate Ruler बनण्याच्या शर्यतीतून आणि फायनलच्या तिकीट मिळण्याच्या शर्यतीतून बाहेर काढावं लागलं. यात सर्वप्रथम मनीषा राणी बाद झाली. त्यानंतर धनश्री वर्मा आणि मग अर्जुन बिजलानी यालाही स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं.

शेवटी फक्त अबाज पटेल आणि बाली हे दोघे उरले. या निर्णायक टास्कमध्ये अरबाजनं आपले सहकारी म्हणून आकृती आणि नयनदीप यांची निवड केली, तर बालीने आरुष आणि आदित्य यांची. शेवटच्या टास्कमध्ये अरबाज पटेलला फायनलसाठी पात्र ठरवण्यात आलं. स्पर्धक धनश्रीबरोबरची त्याची जवळीक आणि दोघांमधील केमिस्ट्रीमुळे ते दोघे प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले.

शोमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा अरबाजची गर्लफ्रेंड निक्की तांबोळीनं घरात अचानक एन्ट्री घेतली. घरात येताच तिनं अरबाजच्या खेळाबद्दल थेट प्रश्न उपस्थित करत त्याला समज दिली होती. “आई, बाबा व आजीला तुझा अभिमान आहे. तूच या शोमधील नंबर वन स्पर्धक आहेस, हे मी सगळ्यांसमोर ठामपणे सांगते”, असं म्हणत निक्कीनं अरबाजला प्रोत्साहित केलं होतं. अरबाजनंही तिने दिलेला सल्ला ऐकत या आठवड्यात उत्तम टास्क खेळला आणि अखेर तो आता अंतिम फेरीत पोहोचला आहे.

Rise And Fall या शोबद्दल सांगायचं झाल्यास, हा एक वेगळ्या संकल्पनेवर आधारित रिअ‍ॅलिटी शो आहे. शोमध्ये दोन गट आहेत, एक Rulers (श्रीमंत सत्ताधारी) – जे आलिशान पेंटहाऊसमध्ये राहतात आणि दुसरे Workers (काम करणारे सामान्य) – जे बेसमेंटमध्ये राहून टास्क करून संपत्ती मिळवण्याचा आणि Rulers ना हटवण्याचा प्रयत्न करतात.

या शोमध्ये अरबाज पटेलव्यतिरिक्त अर्जुन बिजलानी, रॅपर बाली, आरुष भोला, कीकू शारदा, नयनदीप रक्षित, कुब्रा सैत, धनश्री वर्मा आणि इतर सेलिब्रिटींचाही सहभाग आहे.