‘पाताललोक’, ‘क्रिमिनल जस्टिस ३’, ‘कला’ यांसारख्या वेब सीरिजमधून प्रसिद्धी मिळवलेली बंगाली अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी सध्या चर्चेत आहे. शिबपूर या बंगाली चित्रपटाच्या निर्मात्यांनी धमकीचे मेल पाठवल्याचा आरोप स्वस्तिकाने केला आहे. अभिनेत्रीचे काही फोटो मॉर्फ करुन ते पॉर्नोग्राफी साइटवर लीक करण्याची धमकी दिल्याचा आरोप स्वस्तिकाने केला आहे. याप्रकरणी स्वस्तिका मुखर्जीने कोलकाता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

‘ईटाइम्स’शी बोलताना स्वस्तिकाने या प्रकरणाचा खुलासा केला आहे. “२०२२च्या ऑगस्ट/ सप्टेंबर महिन्यात चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं. या चित्रपटासाठी मी माझे १०० टक्के दिले आहेत. ८ जुलै २०२२ रोजी इंडो अमेरिकाना प्रो़डक्शन कंपनीबरोबर झालेल्या करारानुसार, मला मानधनही मिळालं. संदीप सरकार गेल्या महिन्याभरापासून मला व माझी मॅनेजर श्रीस्ती जैनला अपमानास्पद व अश्लील ईमेल पाठवत आहे. त्यांनी आमचे ईमेल आयडी असोसिएट रवीश शर्मा यांच्याबरोबर शेअर केले आहेत,” असं स्वस्तिका म्हणाली.

हेही वाचा>> Video: “कुठे गेली हडळ?”, ‘घर बंदूक बिरयानी’मध्ये हटके भूमिकेत दिसणार नागराज मंजुळे, व्हिडीओत दिसली झलक

“रवीश शर्माने माझे न्यूड फोटो पाठवून मला अश्लील मेसेज केले आहेत. सोशल मीडिया अकाऊंट हॅक करून न्यूड फोटो अपलोड करण्याची धमकीही त्यांनी मला दिली आहे. पॉर्न साइटवर फोटो व्हायरल करण्याची धमकी ते देत आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभागी न होण्याबरोबर अधिक मानधन घेतल्याचं ते म्हणत आहेत. पण मी जेवढं मानधन ठरलं होतं, तेवढंच घेतलं आहे,” असंही पुढे स्वस्तिका म्हणाली.

हेही वाचा>> “मी दोन वेळा पोलीस भरतीसाठी…” आकाश ठोसरचा खुलासा, म्हणाला “सैराटनंतर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलून त्याबाबत माहितीही न दिल्याचा आरोप स्वस्तिकाने केला आहे. याप्रकरणी महिन्याभरापूर्वीच पोलिसांत तक्रार केली आहे. परंतु, तरीही धमकीचे मेल येत असल्याने इस्ट इंडिया मोशन पिक्चर्स असोसिएशनकडे मदत मागितल्याचं स्वस्तिकाचं म्हणणं आहे.