South Crime Thriller Movie OTT: ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे जगभरातील चित्रपट, मालिका आणि शो घरबसल्या पाहता येतात. चित्रपट रसिकांसाठी तर आता जगभरातील कंटेंट त्यांच्या फोनवर उपलब्ध असतो. ओटीटीमुळे प्रेक्षक कुठेही, केव्हाही त्यांच्या आवडत्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. यासाठी त्यांना बाहेर जाण्याचीही गरज नाही. घरी फक्त फोनच नाही तर, लॅपटॉप आणि टीव्हीवरही उत्तम कलाकृती पाहू शकतात. लोकांमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मची क्रेझ खूप वाढली आहे आणि निर्माते काही चित्रपट थेट ओटीटीवर देखील प्रदर्शित करतात. याशिवाय, जर एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला तर तो एक ते दीड महिन्यांत ओटीटीवर देखील येतो.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना सर्वाधिक आवडणाऱ्या चित्रपटांमध्ये क्राइम-थ्रिलर जॉनर अव्वल स्थानावर आहे. बॉलीवूड चित्रपट असो किंवा दाक्षिणात्य चित्रपट, लोकांना ते खूप जास्त आवडतात. तुम्हालाही क्राइम थ्रिलर सिनेमे पाहायला आवडत असतील तर आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. एवढंच नाही तर या सिनेमाचा क्लायमॅक्स ‘दृश्यम’ सारख्या चित्रपटांपेक्षाही दमदार आहे. कोणता आहे हा चित्रपट? ते जाणून घेऊयात.

काय आहे या थ्रिलर चित्रपटाचं नाव?

१ तास ४५ मिनिटांच्या या चित्रपटाचं नाव ‘V1 मर्डर केस’ असं आहे. हा एक थ्रिलर सस्पेन्स तेलुगू चित्रपट आहे, त्याचं दिग्दर्शन पावेल नवगीथनने केलं आहे. या चित्रपटात राम अरुण कास्त्रो, विष्णुप्रिया पिल्लई यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. तसेच गायत्री, लिजीश, माइम गोपी यांनीही काम केलं आहे. हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. तुम्ही चित्रपट पाहायला सुरुवात केल्यावर तुमची स्क्रीनवरून नजर हटणार नाही.

V1 मर्डर केस सिनेमाची कथा काय?

V1 मर्डर केस सिनेमाच्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास ती एक खून प्रकरणाभोवती व अग्नी नावाच्या अधिकाऱ्याभोवती फिरते. सिनेमात एका मुलीचा खून होतो, ती मुलगी तिच्या बॉयफ्रेंडबरोबर लिव्ह इनमध्ये राहत असते. हे प्रकरण एक फॉरेन्सिक अधिकारी हाताळतो. तो ही मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी रात्र-दिवस तपास करतो. पण त्याला अंधाराची भीती वाटत असते. तपास जसजसा पुढे सरकतो, तसं त्याला समजतं की त्या मुलीच्या बॉयफ्रेंडचाही मृत्यू झाला आहे. त्यानंतर या कथेत येणारे ट्विस्ट तुम्हाला चक्रावून सोडतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओटीटीवर कुठे पाहायचा चित्रपट?

‘V1 मर्डर केस’ हा चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट उपलब्ध आहे. युट्यूबवर हिंदीत डब चित्रपट उपलब्ध आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ६.७ रेटिंग मिळालं आहे.