मोठया पडद्यावर आपली हुकमत गाजवणारे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आता ओटीटी माध्यमाकडे वळू लागले आहेत. करोनाकाळानंतर ओटीटी माध्यमाचा वापर अधिकच वाढला आहे. अभिषेक बच्चन, शाहिद कपूर ते माधुरी दीक्षित रवीना टंडनसारखे दिग्गज कलाकार ओटीटीमाध्यमात काम करताना दिसत आहेत. आता बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ओटीटीमध्ये पदापर्णासाठी सज्ज झाले आहेत.

बॉलिवूडमध्ये हीमॅन अशी ओळख असणारे पंजाब पुत्तर धर्मपाजी अर्थात अभिनेते धर्मेंद्र या वयात वेबसीरिजमध्ये काम करणार आहेत. विशेष म्हणजे यातील त्यांच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’ असे या वेबसीरिजचे नाव असून यात नसीरुद्दीन शाह, अदिती राव हैदरी, शुभम कुमार मेहरा, आशिम गुलाटी आदी कलाकार असणार आहेत.

‘तारक मेहता’मध्ये लवकरच परतणार दया भाभी; निर्मात्यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले “आता गरबा..”

धमेंद्र यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटनवरून ही माहिती दिली आहे तसेच लूक शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहले आहे “मित्रांनो, मी शेख स्लिम चिश्ती या सुफी संतांची भूमिका आगामी ताज या मालिकेत करणार आहे. भूमिका छोटी असली तरी महत्त्वाची आहे. तुमच्या शुभेच्यांची गरज आहे.” या शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही वेबसीरिज ऐतिहासिक असून यात मुघल काळ दाखवण्यात येणार आहे. वेबसीरिजचे लेखन सायमन फँटाउझो व दिग्दर्शन रोनाल्ड स्कॅल्पेलो करणार आहेत. विशेष म्हणजे यात मराठमोळा अभिनेता सुबोध भावेदेखील काम करणार आहे. धर्मेंद्र लवकरच करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात दिसणार आहेत.