scorecardresearch

‘तारक मेहता’मध्ये लवकरच परतणार दया भाभी; निर्मात्यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले “आता गरबा..”

तारक मेहता मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिकेतून एक्झिट घेतली आहे

tmkoc
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी तर घराघरात प्रसिद्ध ठरली. दया भाभी या पात्राबाबत निर्मात्यांनी खुलासा केला आहे.

या मालिकेत दया बेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७ पासून मालिकेपासून लांब आहे. ती मालिकेत पुन्हा कधी दिसणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यावरच निर्माते असित कुमार मोदी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, “याचं उत्तर देणं कठीण आहे. आपण सर्वांनी हे मनात पक्के केले आहे की दिशा वाकानी परत यावी. मी देवाला एवढीच प्रार्थना करतो की तिने या मालिकेत परत यावे. सध्या ती तिच्या कौटुंबिक जीवनाला प्राधान्य देत आहे त्यामुळे तिचे येणे थोडे कठीण जात आहे. पण आता टप्पू आल्याने नवीन दया भाभीही लवकरच येणार आहे. दया भाभीचा तोच गरबा, दांडिया सर्व गोकुळधाम सोसायटीत सुरू होणार आहे. यासाठी थोडे थांबा” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पठाण’मधील दृश्यांवर आक्षेप घेणाऱ्या विवेक अग्निहोत्रींचा शाहरुख खानवर कौतुकाचा वर्षाव; म्हणाले, “ज्यांनी विरोध केला…”

मालिकेच्या निर्मात्यांनी नुकतीच टप्पू हे पात्र साकारण्यासाठी नव्या अभिनेत्याची निवड केली आहे. या भूमिकेसाठी निर्मात्यांनी नितीश भलूनीची निवड केली आहे. सुरुवातीला भव्य गांधी या मालिकेत टप्पूची भूमिका साकारत होता, पण काही कारणास्तव त्याने ही मालिका सोडली. त्यानंतर त्याच्या जागी निर्मात्यांनी राज अनाडकतला टप्पू म्हणून मालिकेत आणलं.

२०१७ मध्ये दिशा मॅटरनिटी लीव्हवर गेली होती. तेव्हापासून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर काही महिन्यांनी दिशाने मालिकेचा कायमचा निरोप घेतला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 13:07 IST