बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. विश्वसुंदरीचा किताब पटकवल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सुश्मिता सेन ही तिच्या लव्ह लाईफमुळे सतत चर्चेत असते. मात्र सुश्मिता सेन ही अविवाहित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती सिंगल मदर म्हणून दोन मुलींचे संगोपन करत आहे. नुकतंच तिने तिच्या अविवाहित राहण्याबद्दल खुलासा केला आहे.

वयाची ४५शी ओलांडल्यानंतरही सुश्मिताने लग्न केलेलं नाही. नुकतंच एका मुलाखतीत तिला तुझ्या मुलींना कधीच वडिलांची उणीव भासत नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना सुश्मिताने तिच्या लग्नासह विविध गोष्टींवर भाष्य केले.
आणखी वाचा : “तुझा पहिला पगार किती रुपये होता?” सुश्मिता सेन म्हणाली…

“माझ्या मुलींना तिच्या वडिलांची उणीव कधीच जाणवत नाही. त्यांना वडिलांची गरज नाही. तुम्हाला त्याच गोष्टींची उणीव जाणवते, जी तुमच्याकडे असते. जी गोष्ट तुमच्याकडे कधीच नव्हती, त्या गोष्टी तुम्ही कसे गमावाल?” असे सुश्मिताने म्हटलं.

“जेव्हा मी त्यांना मला लग्न करायचं आहे, असं सांगितलं, तेव्हा त्या म्हणाल्या, का? नेमकं कशासाठी? आम्हाला बाबा नकोय. मी त्यांना म्हणाले की पण मला नवरा हवा आहे आणि त्याचा तुमच्याशी काहीही संबंध नसेल, असं म्हणत मी अनेकदा त्यांची चेष्टा करते”, असेही ती म्हणाली.

“माझे वडील त्यांना आजोबांच्या मायेने नेहमी जवळ घेतात. त्यांच्यासाठी ती गोष्ट पुरेशी आहे. जेव्हा जेव्हा त्यांना वडिलांची आवश्यकता असते, तेव्हा त्यांच्यावळ त्यांचे आजोबा असतात”, असेही तिने यावेळी सांगितले.

आणखी वाचा : “…बस इतकेच”, सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, म्हणाला “रवी जाधव तुझ्या…” 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सुष्मिता सेन ही गेल्या अनेक वर्षांपासून एकटी पालकत्वाची जबाबदारी सांभाळत आहे. अद्याप अविवाहित असलेल्या सुष्मितानं २००० साली तिची मोठी मुलगी रेनी हिला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर २०१० साली तिनं अलिशाला दत्तक घेतलं. आपल्या दोन्ही मुलींसोबत सुष्मिताचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. ती त्याच्यासोबत व्हिडीओ आणि फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या ती ‘ताली’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे