Crime Thrillers On OTT: वीकेंडला ओटीटीवर चित्रपट किंवा सीरिज पाहायचा विचार असेल तर तुमच्यासाठी अनेक क्राइम-थ्रिलर कलाकृती उपलब्ध आहेत. तुम्ही क्राइम-थ्रिलर सिनेमांचे चाहते असाल तर आज आम्ही ज्या कलाकृतींबद्दल सांगणार आहोत, त्या तुम्ही चुकवायला नको. यातील सस्पेन्स व क्लायमॅक्स पाहून तुमचं डोकं चक्रावेल.
करी अँड सायनाइड
Curry And Cyanide on Netflix : या यादीत पहिलं नाव ‘करी अँड सायनाइड’चं आहे. हा एका सत्य घटनेवर आधारित माहितीपट आहे. या माहितीपटात एक महिला तिच्याच कुटुंबातील ६ जणांना मारते. ती हे का करते आणि कशा पद्धतीने करते हे तुम्हाला या माहितीपटात पाहता येईल. हा माहितीपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. तुम्ही नेटफ्लिक्सवर ‘करी अँड सायनाइड’ पाहू शकता.
भक्षक
Bhakshak on Netflix: बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘भक्षक’ चित्रपट होय. यामध्ये ती पत्रकाराच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट बिहारमध्ये होणाऱ्या मुलींच्या लैंगिक शोषणावर आधारित आहे. भूमीला या मुलींबद्दल कसं कळतं आणि नंतर त्यांना वाचवण्यासाठी कसे प्रयत्न करते हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
इत्तेफाक
Ittefaq on Netflix : २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इत्तेफाक’ या मिस्ट्री थ्रिलर चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता अक्षय खन्ना होते. या चित्रपटात अक्षयने पोलीस अधिकारी देव वर्माची भूमिका साकारली होती, जो एका खुनाचे गूढ सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर सोनाक्षीने ‘माया’ची भूमिका साकारली होती. इत्तेफाक नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या चित्रपटाला IMDb वर ७.२ रेटिंग मिळाले आहे.
तलाश
Talaash on OTT : ‘तलाश’ हा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला थ्रिलर मिस्ट्री चित्रपट त्यावेळी लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटात आमिर खान, राणी मुखर्जी आणि करीना कपूरसह अनेक कलाकार होते. तलाश चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. या चित्रपटाला IMDb वर ७.३ रेटिंग मिळाले आहे.
बरोट हाउस
Barot House on OTT : ‘बरोट हाऊस’ हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. यात अमित साध आणि मंजिरी फडणीस यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची कथा अमित बरोट आणि त्याच्या कुटुंबाची आहे. त्यांना ३ मुली आणि एक मुलगा अशी अपत्ये असतात. त्याच्या एका मुलीची हत्या होते, त्यानंतर काही काळानंतर दुसऱ्या मुलीचीही हत्या होते, मग त्यांना मुलगा मल्हारवर संशय येतो आणि वडील अमित मुलाला पोलिसांना सोपवतात. हा चित्रपट Zee5 वर उपलब्ध आहे.