ओटीटीवर बोल्ड विषय व बोल्ड कंटेंट असलेले अनेक चित्रपट रिलीज होत असतात. काही चित्रपट वादातही अडकतात. असाच एक वादग्रस्त चित्रपट आहे, जो त्यातील इंटिमेट सीनमुळे प्रचंड गाजला. ‘Daayre’ (दायरे) असं या सिनेमाचं नाव आहे. हा चित्रपट एक नव्हे तर दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता.
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. रोमँटिक सिनेमांची आवड असणाऱ्यांना हा चित्रपट भावला आहे. प्रदीप राय दिग्दर्शित या चित्रपटात डोना मुन्शी (परी) आणि आरोही खुराना (डिंपल) यांच्या भूमिका आहेत.
१ तास १९ मिनिटांचा हा चित्रपट २१ डिसेंबर २०२३ रोजी थेट ShemarooMe ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच तो एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेवर हिंदी ऑडिओ आणि तेलुगू आणि इंग्रजी सबटायटल्ससह देखील स्ट्रीम होत आहे.
सिनेमाची कथा
सिनेमाची कथा एका छोट्या शहरात राहणाऱ्या दोन बहिणींभोवती फिरते. डिंपल आणि परी एकमेकांचा आधार असतात. जेव्हा कुटुंबाला आर्थिक अडचणी येतात तेव्हा मोठी बहीण, डिंपल कुटुंबाला आधार देण्यासाठी सॉफ्टवेअरची नोकरी करते. पण पगार पुरेसा नसतो, म्हणून ती गुप्तपणे अडल्ट इंडस्ट्रीत काम करू लागते, हे गुपित ती तिच्या बहिणीपासून लपवून ठेवते.
दुसरीकडे परीची स्वप्ने असतात, ती तिला पूर्ण करायची असतात. त्यासाठी ती प्रयत्न करत असते. पण त्याचदरम्यान ती लग्नाच्या एका धोकादायक रॅकेट मध्ये अडकते. कथेत महत्त्वाचा ट्विस्ट परीच्या लग्नाच्या दिवशी येतो. मद्यधुंद नवरदेव परीऐवजी डिंपलबरोबर पहिली रात्र घालवतो. हे ऐकून परीला धक्का बसतो. यानंतर दोघी बहिणींच्या नात्यात दुरावा येऊ लागतो.
या कथेत पुन्हा एक ट्विस्ट येतो. दोघी बहिणींना एकमेकांसाठी केलेल्या त्यागाची जाणीव होते आणि त्या माफी मागतात. क्लायमॅक्समध्ये त्या त्यांच्या समोर येणऱ्या आव्हानांना एकत्र तोंड देताना दिसतात. भावनिक दृश्यांनी भरलेला हा चित्रपट एका दुःखद वळणावर संपतो. ते वळण काय असतं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. एकंदरीतच, रोमँटिक सिनेमांची आवड असणाऱ्यांसाठी या सिनेमाची कथा खूपच रंजक आहे.