‘शोले’ हा भारतातील सर्वात मोठा हिट चित्रपट आहे असं म्हणतात. या चित्रपटाची २० कोटींहून जास्त तिकिटं विकली गेली होती. असं असलं तरी ‘शोले’ हा सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट नाही. टीव्ही व ओटीटी आल्यावर हे समीकरण बदललं. आता प्रेक्षकांची संख्या TRPS, स्ट्रीमिंग मिनिटं व युट्यूब व्ह्यूजमध्ये मोजली जातात. या सर्व निकषांनुसार भारतातील सर्वाधिक पाहिला चित्रपट अमिताभ बच्चन यांचा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

सोनी मॅक्स नावाचं चॅनल टीव्हीवर पाहणाऱ्यांना हे माहीतच असेल की अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ हा भारतातील सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट आहे. ईव्हीव्ही सत्यनारायण दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन, सौंदर्या, जयसुधा, रचना बॅनर्जी, अनुपम खेर व कादर खान यांच्या भूमिका होत्या. १९९९ साली थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट फ्लॉप झाला होता. त्याने जगभरात फक्त १२.६५ कोटी रुपये कमावले होते.

या चित्रपटाचं नाव ‘सूर्यवंशम’ आहे. याचे सॅटेलाइट प्रिमियर सोनी मॅक्सवर झाले होते. तेव्हापासून २५ वर्षात तो मॅक्सवर शेकडो वेळा दाखवण्यात आला आहे. BARC च्या डेटानुसार, २०१७ च्या शेवटपर्यंत ‘सूर्यवंशम’च्या री-रनला ४.४ मिलियन इम्प्रेशन मिळत होते. तज्ज्ञाच्या मते किमान २५-३० कोटी किंवा त्याहून जास्त लोकांनी हा सिनेमा पाहिला असावा. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर आहे, तिथूनही याला व्ह्यूज मिळाले आहेत.

‘शोले’ व ‘बाहुबली’ला टाकलं मागे

‘सूर्यवंशम’ला रेकॉर्डब्रेक व्ह्यूज युट्यूबवर मिळाले आहेत. गोल्डमाइन्स एंटरटेनमेंटकडे याचे युट्यूब राइट्स आहेत. त्यांनी हा चित्रपट वेगवेगळ्या ३ चॅनलवर अपलोड केला आहे. याला युट्यूबवर एकूण ७०१ मिलियन म्हणजेच ७० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

१०० कोटींहून जास्त व्ह्यूज

अमिताभ बच्चन यांच्या ‘सूर्यवंशम’ या चित्रपटाला सर्व प्लॅटफॉर्मवर अंदाजे १०० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. ‘शोले’ला यूट्यूबवर फक्त २ मिलियन, तर ‘डीडीएलजे’ला एक मिलियनपेक्षा कमी व्ह्यूज मिळाले आहेत. ‘बाहुबली: द बिगिनिंग’ला यूट्यूबवर एकूण २० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र कोणताच चित्रपट व्ह्यूजच्या बाबतीत ‘सूर्यवंशम’ जवळ पोहोचू शकलेला नाही.

मोफत पाहता येईल सिनेमा

१९९९ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट तब्बल ७ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. एक वडील व त्याच्या आज्ञाधारक मुलाभोवती फिरणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. तुम्ही हा चित्रपट प्राइम व्हिडीओ व युट्यूबवर उपलब्ध आहे.