आधी चित्रपट फक्त सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केले जायचे, पण करोना काळापासून ओटीटी प्लॅटफॉर्म्स खूप लोकप्रिय झाले आणि निर्माते चित्रपट प्रदर्शनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म्सही वापरू लागले. अनेक चित्रपट फक्त ओटीटीवर प्रदर्शित केले जातात. तर काही चित्रपट आधी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होतात आणि नंतर ते ओटीटीवर येतात. ओटीटीवर सिनेमे पाहणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे.

ओरमॅक्स मीडियाने मंगळवारी (१६ जानेवारी रोजी) ‘स्ट्रीमिंग ओरिजिनल्स इन इंडिया: द 2023 स्टोरी’ या शीर्षकाखाली एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. यामध्ये सर्वाधिक पाहिले गेलेले वेब शो, आंतरराष्ट्रीय शो, आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि हिंदी चित्रपटांची यादी दिली गेली आहे. यांचे प्रीमियर भारतातील विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर झाले होते.

१९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून वेगळी झाली मराठमोळी अभिनेत्री, पण घटस्फोट घेणार नाही; कारण…

२०२३ मध्ये ओटीटीवर सर्वाधिक पाहिला गेलेला हिंदी चित्रपट जान्हवी कपूर आणि वरुण धवन स्टारर ‘बवाल’ हा होता. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि दुसर्‍या महायुद्धादरम्यान युरोपियन ज्यूंचा नरसंहार, होलोकॉस्ट यांचे संदर्भ होते. यावरून वादही झाला होता. या चित्रपटातील संदर्भांबद्दल भारतातील इस्रायली दूतावासाने नाराजी व्यक्त केली होती. पण ओरमॅक्सच्या रिपोर्टनुसार, ‘बवाल’ हा वादग्रस्त चित्रपट २१.२ मिलियन लोकांनी पाहिला असून हा २०२३ मधील ओटीटीवर सर्वाधिक पाहिला गेलेला हिंदी चित्रपट आहे. यासंदर्भात ‘डीएनए’ने वृत्त दिलंय.

खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या

शाहिद कपूरचा अॅक्शन थ्रिलर ‘ब्लडी डॅडी’ आणि मनोज बाजपेयी आणि शर्मिला टागोर स्टारर कौटुंबिक ड्रामा ‘गुलमोहर’ हे सिनेमे अनुक्रमे १७ मिलियन आणि १६.३ मिलियन व्ह्यूवरशिपसह यादीत पुढील दोन स्थानांवर आहे. ‘ब्लडी डॅडी’ जिओ सिनेमावर तर ‘गुलमोहर’ डिज्नी प्लस हॉटस्टार वर गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता.

या यादीत ‘तुमसे ना हो पायेगा’ हा चित्रपटही आहे. इश्वाक सिंग, महिमा मकवाना, गौरव पांडे आणि गुरप्रीत सैनी अभिनीत या चित्रपटाला १४.३ मिलियन व्ह्यूज आहेत. तर तारा सुतारियाचा थ्रिलर सिनेमा ‘अपूर्वा’ ला १२.५ मिलियन व्ह्यूज आहे. हे दोन्ही चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाले होते.

पती नुपूर शिखरेपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे आयरा खान; आमिर खानची लेक २६ वर्षांची, तर जावई…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटफ्लिक्सवर प्रीमियर झालेला सिद्धार्थ मल्होत्राचा ‘मिशन मजनू’ चित्रपट हा २०२३ मध्ये १०.८ मिलियन व्ह्यूवरशिपसह दहाव्या क्रमांकाचा डायरेक्ट-टू-ओटीटी चित्रपट आहे. सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर यांचा पदार्पणाचा चित्रपट ‘द आर्चीज’ हा या यादीत १३ व्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाला १० मिलियन व्ह्यूज आहेत. तर, लस्ट स्टोरीज १५ व्या क्रमांकावर असून त्याला ९.८ मिलियन व्ह्यूज मिळाले होते.