बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या बेधडक विधानांसाठी ओळखली जाते. कंगना सध्या तिच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘टिकू वेड्स शेरू’ हा आज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला मिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

तर कंगना राणौतने चित्रपटाला नावं ठेवणाऱ्या समीक्षकांवर सडकून टीका केली असून, चित्रपट माफियालाही कंगनाने चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. कंगना म्हणते, “लोक मला मेसेज करून चित्रपटातील शायरी काव्य प्रचंड आवडल्याचं सांगत आहे. होय, चित्रपटातील सर्व शायरी मी लिहिल्या आहेत. चित्रपट माफियाकडून चित्रपटाचे नुकसान करण्याचा पूर्ण प्रयत्न होत आहेत. खोटे समीक्षण देऊन चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी माझ्या विरोधात मोहीम सुरू केली होती.”

आणखी वाचा : “त्या महिलेने माझ्या पायापाशी…” ‘रामायण’फेम अरुण गोविल यांनी सांगितला शूटिंगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

पुढे कंगनाने प्रेक्षकांना विनंती करत हा चित्रपट पाहायचे आवाहन केले आहे. खोटे रिव्यू न वाचता प्रेक्षकांनी ओटीटीवर चित्रपट पहावा आणि त्यांचा अभिप्राय कळवावा अशी विनंतीही कंगनाने या पोस्टच्या माध्यमातून केली आहे. कंगनाच्या या चित्रपटातील नवाझ आणि अवनीत यांच्या जोडीवरुनही प्रचंड लोकांनी ट्रोल केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
kangana-post
फोटो : सोशल मिडिया

चित्रपटसृष्टीतील माफियाविरोधात आवाज उठवण्याची कंगनाची ही पाहिली वेळ नाही. याआधीही कंगनाने त्यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. याबरोबरच कंगना बॉलिवूडमधील नेपोटीजम विरोधातही स्पष्ट भूमिका घेत असते. कंगना आता लवकरच ‘इमर्जन्सि’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तिने भूतपूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची भूमिका निभावली असून या चित्रपटाचं दिग्दर्शनही तिने केलं आहे.