बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या हटके फॅशनमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. याबरोबरच तो त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय टॉक शोसाठी प्रचंड लोकप्रिय आहे. करणच्या या टॉक शोवर वेगवेगळे बॉलिवूड सेलिब्रिटीज हजेरी लावतात आणि धमाल गप्पा आणि गॉसिप करतात. त्याचा हा शो प्रथम टेलिव्हिजनवरही यायचा, पण गेल्याच वर्षी आलेल्या सीझनपासून करणने हा शो फक्त ओटीटीवर येणार असल्याचं जाहीर केलं.

आता या शोच्या आठव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. नुकतंच करणने या सीझनची पुष्टी केली असून सोशल मीडियावर या नव्या सीझनचे टीझर आणि अपडेटसुद्धा आले आहेत. असं म्हंटलं जातंय की या सीझनमध्ये करण कोणत्या स्टारकिड्सना नव्हे तर त्याचं ज्यांच्याशी वैर आहे अशा काही इंडस्ट्रीतील लोकांना बोलवणार आहे.

आणखी वाचा : ‘जवान’नंतर संजय लीला भन्साळी यांच्या ‘या’ चित्रपटात झळकणार नयनतारा? रणवीर व आलियाही दिसणार मुख्य भूमिकेत

मीडिया रीपोर्टनुसार बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा ‘कॉफी विथ करण’च्या नव्या सीझनमध्ये पुन्हा दिसणार असल्याची चर्चा आहे. करण व कार्तिकमध्ये ‘दोस्ताना २’वरुन झालेल्या गैरसमजांबद्दल दोघे या शोवर उघडपणे भाष्य करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, कार्तिकने अद्याप या गोष्टीची पुष्टी केलेली नसली तरी तो या नव्या सीझनमध्ये येणार असल्याची शक्यता आहे. शिवाय या नव्या सीझनच्या एपिसोडमध्ये करण व कार्तिक त्यांच्यात निर्माण झालेल्या तणावाबद्दल आणि एकूणच मीडियाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या गैरसमजाबद्दल सविस्तर चर्चा करतील. २०१८ मध्ये ‘लुका छुपी’ प्रदर्शित झाल्यावर कार्तिक आर्यनने क्रीती सेनॉनसह कॉफी विथ करणवर हजेरी लावली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२१ मध्ये कार्तिक आर्यनला धर्मा प्रोडक्शनच्या ‘दोस्तान २’मध्ये मुख्य भूमिकेसाठी घेण्यात आलं होतं. नंतर काही कारणास्तव कार्तिकला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मानधनावरुन कार्तिक आणि करण जोहरमध्ये काही वाद झाले अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. आता ‘कॉफी विथ करण’च्या नव्या एपिसोडमध्ये कार्तिकने हजेरी लावली तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. ‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझन २६ ऑक्टोबरपासून डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.