Killer Soup ही वेबसीरिज ११ जानेवारी या दिवशी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते आहे. मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेनशर्मा या दोघांची या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिका आहे. या वेबसीरीजच्या माध्यमातून मनोज वाजपेयी आणि कोंकणा सेनशर्मा पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या वेबसीरीजचं दिग्दर्शन अभिषेक चौबेने केलं आहे. ‘इश्किया’, ‘उडता पंजाब’ आणि ‘सोनचिडिया’ असे चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या अभिषेक चौबेची ही पहिलीच वेबसीरिज असणार आहे.

मर्डर मिस्ट्री?

नेटफ्लिक्सवर ‘किलर सूप’ या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही एक मर्डर मिस्ट्री आहे असं दिसतं आहे. डार्क थ्रिलर या जॉनरमध्ये हा प्रकार मोडतो. तसंच ही वेब सीरिज म्हणजे एक ब्लॅक कॉमेडीही असणार आहे असंही दिसतं आहे.

मनोज वाजपेयीचे तीन लूक

किलर सूप या वेबसीरिजचा ट्र्रेलर सुरु होताच मनोज वाजपेयीचे तीन वेगळे लूक दिसत आहेत. त्यामुळे या वेब सीरिजमध्ये मनोज वाजपेयीची दुहेरी भूमिका असण्याची शक्यता आहे. कोंकणा सेन या वेब सीरिजमध्ये एका शेफच्या भूमिकेत दिसते आहे. तसंच ती मनोजची पत्नी आहे हेदेखील ट्रेलरमध्ये दिसतं आहे. मर्डरचा उल्लेखही यात आहे. तसंच ४१ कोटींच्या हेराफेरीचाही उल्लेख आहे. त्यामुळे ही सीरिज नेमकी कशी असणार आहे? त्याची उत्सुकता ताणली गेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सयाजी शिंदे महत्त्वाच्या भूमिकेत

‘किलर सूप’ या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, तसंच नासीर यांच्याही भूमिका आहेत. जो ट्रेलर समोर आला आहे त्यावरुन सयाजी शिंदे एखाद्या गँगस्टरच्या भूमिकेत असू शकतात असा अंदाज आहे. तसंच या सीरिजचं नाव किलर सूप का दिलंय ते ट्रेलरच्या शेवटी समजतं आहे. पण अर्थातच या सीरिजची स्टोरी नेमकी काय असेल याचा अंदाज येत नाही. त्यामुळे आता सीरिजमध्ये नेमकं काय असणार हे ती सीरिज प्रदर्शित झाल्यावरच कळणार आहे. अशात या सीरिजचा ट्रेलर चर्चेत आला आहे.