किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एका महिन्याआधी प्रदर्शित झाला. बॉक्स सरासरी कमाई करणारा हा चित्रपट ओटीटीवर मात्र धुमाकूळ घालत आहे. चित्रपट ओटीटीवर इतका जबरदस्त चालतोय की त्याने रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटालाही मागे टाकलं आहे.

‘लापता लेडीज’ हा चित्रपट १ मार्च रोजी थिएटर्मध्ये प्रदर्शित झाला होता. किरण रावच्या चित्रपटाचं समीक्षक आणि प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. महिला सक्षमीकरणावर भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना क्षणभर हसवलं तर रडवलंही. थिएटर्सनंतर हा चित्रपट २६ एप्रिल रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला. ओटीटीवर व्ह्यूजच्या बाबतीत या चित्रपटाने संदीप रेड्डी वांगा यांच्या ब्लॉकबस्टर ‘अॅनिमल’ला मागे टाकलं आहे.

एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?

एका महिन्यात ‘लापता लेडीज’ हा चित्रपट तब्बल १३.८ मिलियन लोकांनी पाहिला आहे. एका महिन्यात या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर विक्रमी व्ह्यूज मिळाले आहेत. दुसरीकडे रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ला आतापर्यंत १३.६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ‘लापता लेडीज’ला हे व्ह्यूज एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत मिळाले आहेत, तर ‘ॲनिमल’ला जवळपास चार महिन्यात इतके व्ह्यूज मिळाले आहेत. ‘ॲनिमल’ १ डिसेंबर २०२३ ला सिनेमागृहांमध्ये आणि २६ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला होता.

Video: पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलं लग्न, दुसऱ्यांदा आई झाली अभिनेत्री; बाळाचं नाव केलं जाहीर

किरण रावने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्ह्यूजसंदर्भातील पोस्ट शेअर केली व आश्चर्य वाटणारे इमोजी वापरले होते.

किरण रावची इन्स्टाग्राम स्टोरी

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट बिप्लब गोस्वामी यांच्या कादंबरीवर आधारित आहे. यात रवी किशन व्यतिरिक्त स्पर्श श्रीवास्तव, प्रतिभा रांता, नितांशी गोयल व छाया कदम यांच्या भूमिका आहेत. ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची निर्मिती आमिर खानने केली आहे. चार ते पाच कोटींचं बजेट असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २१.६५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी OTT वर पाहता येणार; या वीकेंडला प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती कोणत्या? वाचा नावं

‘अॅनिमल’बद्दल बोलायचं झाल्यास संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर व रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्याशिवाय यात अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डीमरी, सिद्धांत कर्णिक यांनीही महत्त्वाची पात्रं साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ८०० कोटींहून अधिक कमाई केली. विषारी पुरुषत्व, हिंसाचार, नग्न दृश्य अशा बऱ्याच गोष्टींचा ‘अ‍ॅनिमल’मध्ये भडिमार असल्याने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यावर टीका झाली. या चित्रपटावरून किरण राव व आमिर खान यांच्यातील शाब्दिक वादही चांगलाच गाजला होता.