के मेनन, आर माधवन, बाबिल खान आणि दिव्येंदु यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द रेल्वे मेन’ या वेबसीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ही वेब सिरीज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी सज्ज आहे. चार भागांची ही मिनी सीरिज एका सत्य घटनेवर बेतलेली आहे. ‘द रेल्वे मेन’ची कथा जगातील सर्वात भयंकर अशा भोपाल गॅस दुर्घटनेवर आधारित आहे.

या ट्रॅजडीमधील अज्ञात लोकांच्या शौर्याची गोष्ट या सीरिजमधून दाखवण्यात येणार आहे. १९८४ मध्ये झालेल्या या घटनेच्या आजही कित्येक कटू आठवणी लोकांच्या मनात आहेत. टीझरमध्ये या भयंकर घटनेशी मिळती जुळती काही तीव्र आणि भयानक दृश्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या सीरिजमध्ये लोकांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे अन् टीझरमध्ये प्रत्येक क्षणाला तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारे सीन्सदेखील पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा : भोपाळ गॅस दुर्घटनेवर बेतलेल्या ‘द रेल्वे मेन’ सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित; आर. माधवन, केके मेनन मुख्य भूमिकेत

यामध्ये ४ वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं या दुर्घटनेच्यावेळी नेमकं कशारीतीने लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात त्याची एक छोटीशी झलक या टीझरमध्ये पाहायला मिळाली आहे. टीझरमधून फार काही सांगितलं नसलं तरी प्रेक्षकांची उत्सुकता याने कायम ठेवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल यांचे सुपुत्र शिव रवैल या सीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. ‘द रेल्वे मेन’ची निर्मिती YRF एंटरटेनमेंट व नेटफ्लिक्स यांनी एकत्रित येऊन केली आहे तर याची कथा आयुष गुप्ता यांनी लिहिली आहे. भोपाळमधील युनियन कार्बाइड कंपनीच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली होती, ज्यामुळे १५ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याच घटनेवर ही सीरिज बेतलेली आहे. १८ नोव्हेंबरपासून ही सीरिज जगभरात सर्वत्र नेटफ्लिक्सच्या माध्यमातून पाहता येणार आहे.