बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड म्हणून ओळखला जाणारा ओरहान अवत्रामणी म्हणजेच ऑरी नेहमीच चर्चेत असतो. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांबरोबर ऑरी दिसून येतो. सोशल मीडियावर ऑरीच्या फोटोंची अनेकदा चर्चाही होते. दरम्यान, नुकतेच ऑरीने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच लव्ह लाइफबाबतही मोठा खुलासा केला आहे.
ऑरी म्हणाला, “माझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना माझ्यासारखाच विचार करण्यास सांगितले आहे. एवढंच नाही, तर त्यांना माझ्यासारखेच राहायला आणि माझ्यासारखाच ड्रेस घालावा लागतो. मी माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वत: नाव दिले आहे. त्यांना ऑरी नंबर १, ऑरी नंबर २ अशी हाक मारली जाते. माझ्याकडे एकूण सहा लोक आहेत जे मला सतत चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या युकत्या सुचवतात.
दरम्यान कॉफी विथ करणमध्ये ओरीने त्याच्या लव्हलाईफबाबतही मोठा खुलासा केला आहे. ओरी म्हणाला की, “आपल्याला आयुष्यात एकदाच तारुण्य मिळते. त्यामुळे मी एकाच वेळी ५ जणांना डेट करत आहे. कारण एकाला डेट करण्यात एवढी गंमत असेल तर पाच जणांना डेट करताना ती गंमत आणखी वाढेल. मात्र हे पाचही जण एकमेकांना ओळखत नाहीत. त्यांच्यात भांडण व्हावं असं मला वाटत नाही. मला लग्न करायचे नाही कारण तुम्ही लग्न केल्यावर कोणाची फसवणूक करु शकत नाही. पण मी सध्या फसवणूक करत आहे. “
हेही वाचा- ‘या’ कारणामुळे नीतू कपूर व आलियात होतात वाद; म्हणाल्या, ” तिची आई सोनी राजदान…”
दरम्यान, कॉफी विथ करणमध्ये ऑरीने एक गमतीशीर किस्साही सांगितला आहे. ऑरी म्हणाला की, लंडनमध्ये मला माझ्यासारखी दिसणारा एक व्यक्ती दिसली. मी लगेच त्याला नोकरी दिली. माझ्याजवळ माझ्यासारख्याच दिसणाऱ्या तीन व्यक्ती आहेत. मला ज्या कार्यक्रमात जायचे असते, तिथे मी पोहोचण्याअगोदर माझ्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाठवले जाते. फक्त त्यांना तिथे बोलण्यास मनाई आहे. जेव्हा मी स्वत: त्या कार्यक्रमात पोहोचतो तेव्हा त्या व्यक्तींना तिथून जायला सांगितले जाते.