बॉलीवूड निर्माता करण जोहर हा सध्या त्याच्या ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमुळे खूपच चर्चेत आहे. बॉलीवूडमधील बऱ्याच कलाकारांनी करणच्या या शोमध्ये हजेरी लावली आहे. ‘कॉफी विथ करण ८’च्या नवीन भागात नीतू कपूर व झीनत अमान या बॉलीवूडच्या दोन ज्येष्ठ अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात दोघींनी आपल्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, या शोमध्ये नीतू कपूर यांनी त्या व आलिया यांच्यात होणाऱ्या भांडणामागचे कारणही सांगितले आहे.
करणच्या शोमध्ये नीतू कपूर यांनी राहाबााबत अनेक खुलासे केले आहेत. त्या म्हणाल्या “राहामुळे माझ्यात आलियामध्ये भांडण होतात. एवढचं नाही तर आलियाची आई सोनी राजदान यांच्याबरोबरही भांडणं होतात. नीतू कपूर म्हणाल्या मी राहाला बाबा म्हणायला शिकवत आहेत तर आलियाची आई सोनी राजदान राहला आई म्हणायला शिकवत आहे. एक दिवस आलिया माझ्याजवळ आली आणि म्हणाली राहाने मम्मा म्हणून हाक मारली. यावर मी म्हणाले राहाच्या तोंडून मम्मा नाही मम-मम हा शब्द बाहेर पडला आहे. तू एवढी खूश होऊ नकोस.” राहा नाना नाही तर दादा म्हणत असल्याचेही नीतू कपूर म्हणाल्या.
नातीचे नाव राहा का ठेवले?
“आलिया व रणबीरने आपल्या मुलीचे नाव राहा का ठेवले याबाबत नीतू कपूर यांनी खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, जेव्हा जेव्हा मी माझ्या नातीला बघते तेव्हा तेव्हा मला आतून खूप शांत वाटते. तिचा चेहरा हसरा आणि प्रसन्न आहे. राहा हे नाव तिच्यासाठी अगदी योग्य आहे.”
हेही वाचा- जान्हवी कपूरने सांगितले बहीण खुशी व आई श्रीदेवी यांच्यातील साम्य, म्हणाली, “चित्रपटादरम्यान…”
नोव्हेंबर २०२२ मध्ये आलिया व रणबीरची मुलगी राहाचा जन्म झाला. गेल्यावर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२२ मध्ये राहाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला होता. कपूर कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात राहाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. एवढचं नाही तर तब्बल एक वर्षानंतर म्हणजेच गेल्या वर्षीच्या ख्रिसमसच्या दिवशी आलिया व रणबीरने राहाचा चेहऱा पहिल्यांदा मीडियासमोर दाखवला होता. लग्नाच्या काही महिन्यानंतरच आलियाने गरोदरपणाची बातमी दिली होती. त्यामुळे लग्नाअगोदरच आलिया गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.