OTT Releases Of This Week : ओटीटीवर नवीन काय पाहायला मिळणार, कोणत्या कलाकारांच्या नवीन सीरिज, चित्रपट प्रदर्शित होत आहेत याची ओटीटीप्रेमींमध्ये नेहमीच उत्सुक्ता असते. हॉरर, सस्पेंस, थ्रिलर आणि कॉमेडी अशा जॉनरच्या अनेक कलाकृती ओटीटीवर प्रदर्शित होत असतात. नोव्हेंबर महिन्यातही अनेक विविध धाटणीचे सिनेमे, सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.

या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाची परवणी असणार आहे. लोकप्रिय अभिनेता मनोज बाजपेयीची ‘फॅमिली मॅन ३’ ही सीरिज ते जान्हवी कपूर व इशान खट्टरचा ‘होमबाउंड’ हा सिनेमा. पाहता येणार आहे. तर या आठवड्यात ओटीटीवर काय प्रदर्शित होणार जाणून घेऊ…

या आठवड्यात ‘हे’ सीरिज व चित्रपट होणार प्रदर्शित

द फॅमिली मॅन ३ – ‘द फॅमिली मॅन’ ही ओटीटीवरील लोकप्रिय सीरिज आहे. मनोज बाजपेयी यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. यातील त्याच्या अभिनयासाठी अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. सध्या तो या सीरिजच्या तिसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. ‘द फॅमिली मॅन ३’ ही सीरिज या आठवड्यात आपल्याला पाहता येणार आहे. ही सीरिज येत्या २१ नोव्हेंबरला ॲमझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

द बंगाल फाइल्स – विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला तेव्हा मेकर्सला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होती, परंतु बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पल्लवी जोशीने निर्मिती केलेल्या या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, स्वत: पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि इतरही अनेक लोकप्रिय कलाकार पाहायला मिळतात. हा चित्रपट आता तुम्ही घर बसल्या पाहू शकता. येत्या २१ नोव्हेंबरला हा सिनेमा झी ५ वर प्रदर्शित होत आहे.

होमबाउंड – इशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांचा ‘होमबाउंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अनेकांच्या पसंतीस उतरला होता. ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्येही या चित्रपटाचं कौतुक झालं. तर आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ‘होमबाउंड’ सिनेमा २१ नोव्हेंबरपासून तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

Ziddi Ishq- अदिती पोहनकर आणि परमब्रीत चट्टोपाध्याय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेली ही एक थ्रिलर आणि रोमँटिक सीरिज आहे. ही सीरिज तुम्ही २१ नोव्हेंबरपासून हॉटस्टारवर पाहू शकता.

Dining with the Kapoors – फिल्म आणि सीरिजच्या व्यतिरिक्त या आठवड्यात ओटीटीवर बॉलीवूडमधील लोकप्रिय कपूर कुटुंबाचा डायनिंग विथ त कपूर्स हा शोसुद्धा प्रदर्शित होत आहे. यामध्ये रणबीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर आणि कपूर कुटुंबातील इतरही काही सदस्य पाहायला मिळतील. २१ नोव्हेंबरला हा शो नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.