हिंदी व इंग्रजी सिनेमा, वेब सीरिजप्रमाणेच आता मराठीतही थिएटरमध्ये न प्रदर्शित करता थेट ओटीटीवर रिलीज करण्याचे प्रयोग निर्माते करत आहेत. लवकरच ‘रंगीत’ नावाचा मराठी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. हा सिनेमा कधी, कुठे पाहता येईल ते जाणून घेऊयात.

आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनवासवर पडलेला काळा रंग. अशा या विरहामागे एक रहस्यमय घटना असेल तर? एक रहस्यमय आणि रंगहीन घटना ‘रंगीत’ या चित्रपटात दडून बसली आहे, जी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. ‘रंगीत’ हा मराठी चित्रपट १७ मे २०२४ रोजी थेट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना आजवर न मिळालेल्या एका थरारक चित्रपटाचा मनमुराद आस्वाद घेता येणार आहे.

हेही वाचा – ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

चित्रपटाची कथा एका फाईन आर्ट्स महाविद्यालयाच्या आवारात फिरते. विरहाच्या नैराश्येमुळे कायम नशेत असणारा सिद्धार्थ महाविद्यालयाच्या आवारात फिरत असतो. महाविद्यालयात नव्यानेच प्रवेश घेतलेल्या शिवाला आवारात एका स्त्रीच्या आत्म्याचा भास होत आहे. आत्म्याचा आणि सिद्धार्थच्या प्रेयसीचा चेहरा एकच असल्याचं लक्षात येतं. पण त्याला अचानक सोडून गेलेली प्रेयसी मरण पावली कशी याचा शोध सुरू होतो. तिच्या मरणाचं कारण भयंकर असून त्यामागील रहस्यमय कथा प्रेक्षकांना चित्रपटात पहायला मिळणार आहे.

rangeet marathi movie
मराठी चित्रपट रंगीतचं पोस्टर (फोटो – पीआर )

हेही वाचा – बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

चित्रपटाचे दिग्दर्शन प्रज्योत दिवाकरराव कडू यांनी केले असून मकरंद अनासपूरे, सयाजी शिंदे, भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहेरे या स्टार अभिनेत्यांनी चित्रपटात आपल्या अनोख्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट अल्ट्रा झकास या ओटीटीवर प्रेक्षकांना पाहता येईल.

हेही वाचा – “मला त्याबद्दल शून्य इंटरेस्ट…”, सुबोध भावे ‘त्या’ प्रश्नावर स्पष्टच बोलला; अभिनेत्याने पुण्यात केलं मतदान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मराठी मातीतल्या चित्रपटांमध्ये अनेकानेक प्रयोग व्हावेत असं नेहमी वाटतं. अशाच एका प्रयोगातून जन्मलेला हा ‘रंगीत’ चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करेल, याची शास्वती वाटते. म्हणून ‘रंगीत’ सारखा चित्रपट थेट अल्ट्रा झकास ओटीटीवर प्रदर्शित करत आहोत,” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.