जून महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक मोठे चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाल्या होत्या. आता लोक जुलैच्या पहिल्या आठवड्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण बहुप्रतिक्षीत ‘मिर्झापूर ३’ रिलीज होणार आहे. चाहते खूप दिवसांपासून सीरिजच्या तिसऱ्या पर्वाची वाट पाहत होते. गुड्डू भैय्या आणि कालीन भैय्या यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्ष उत्सुक होते. अखेर प्रतीक्षा संपली आहे, ही सीरिज जुलैच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होणार आहे. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपट ‘गरुडन’ आणि अनेक सीरिजही याच आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत.
मिर्झापूर ३
‘मिर्झापूर सीझन ३’ या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. मिर्झापूरचा तिसरा सीझन ५ जुलै रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होईल. आधीच्या दोन सीझननंतर तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली असून ही सीरिज शुक्रवारपासून ओटीटीवर पाहता येईल.
मराठी अभिनेत्रींची हिंदी मालिकेच्या सेटवर झाली मैत्री; म्हणाली, “जेव्हा दोन महाराष्ट्रीय लोक….”
गरुडन
चित्रपटगृहांमध्ये जबरदस्त कमाई केल्यानंतर आता ‘गरुडन’ हा दाक्षिणात्य चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ३ जुलै रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. अवघे २० कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या या चित्रपटाने ५० कोटींहून अधिक व्यवसाय केला.
मलयाली फ्रॉम इंडिया
मल्याळम कॉमेडी-ड्रामा फिल्म ‘मलयाली फ्रॉम इंडिया’ १ मे रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. याता दोन महिन्यांनी हा चित्रपट ओटीटीवर येणार आहे. ५ जुलै रोजी सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होईल.
“मीच घर चालवते त्यामुळे…”, सई ताम्हणकरने सांगितला घटस्फोटानंतरचा अनुभव; आईबद्दल म्हणाली….
रेड स्वान
कोरियन वेब सीरिज ‘रेड स्वान’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर ३ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.
स्पेस कॅडेट
एम्मा रॉबर्ट्सचा ‘स्पेस कॅडेट’ चित्रपट ४ जुलै रोजी प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.
ही वेंट दॅट वे
‘ही वेंट दॅट वे’ ५ जुलै रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.
बॉब मार्ले: वन लव्ह
‘बॉब मार्ले: वन लव्ह’ हा अमेरिकन बायोग्राफिकल ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट दिवंगत गायक बॉब मार्ले यांच्या जीवनावर आधारित आहे. तुम्ही प्राइम व्हिडिओवर ३ जुलैपासून हा सिनेमा पाहू शकता.
गोयो: द बॉय जनरल
गोयो: द बॉय जनरल नेटफ्लिक्सवर ५ जुलै रोजी प्रदर्शित होईल.
बेव्हर्ली हिल्स कॉप: एक्सेल एफ
‘बेव्हर्ली हिल्स कॉप: एक्सेल एफ’ ३ जुलै रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.
 
  
  
  
  
  
 