इंटरनेटचा सुळसुळाट आणि प्रत्येकाच्या हातात आलेला स्मार्टफोन यामुळे सगळं जग जवळ आलं आहे. यामुळे काही फायदे झाले आहेत तर काही बाबतीत तरूणांचं नुकसानही झालं आहे. यामागे असलेल्या असंख्य कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे ‘पॉर्न फिल्म्स’. आज पॉर्न साईटव बंदी जरी घातली गेली असली तरी त्याची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नाही. आजही लोक सर्रास इंटरनेटवर पॉर्न बघत आहेत.
याच पॉर्न विश्वातील एक मोठा स्पर्धक म्हणजे ‘पॉर्नहब’ ही वेबसाईट. आज संपूर्ण जगात या वेबसाईटवरील पॉर्न कंटेंट सर्वात जास्त पाहिला जातो आणि पसंत केला जातो. याच वेबसाईटचा प्रवास मांडणारी एक डॉक्युमेंटरी लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या माहितीपटात या वेबसाईटचा प्रवास आणि यशाबद्दल आणि त्यांना आलेल्या समस्यांबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. अमेरिकेत हा एक कायदेशीर व्यवसाय असल्याने तिथे अशा बऱ्याच वेबसाईटचा सुळसुळाट आपल्याला पाहायला मिळतो, त्यापैकी ‘पॉर्नहब’ ही जगात सर्वात जास्त पाहिली जाणारी वेबसाईट आहे.
‘मनी शॉट : द पॉर्नहब स्टोरी’ हे या डॉक्युमेंट्रीचं नाव आहे आणि यामधून जगभरात सर्वात जास्त प्रमाणात पहिल्या जाणाऱ्या पॉर्नसाईटचा प्रवास आणि यामुळे समाजात निर्माण झालेले गैरसमज यावर भाष्य करण्यात येणार आहे. पॉर्न इंडस्ट्रीमुळे निर्माण झालेली सेक्स ट्रॅफिकिंगची समस्या, सेक्स वर्कर आणि पॉर्नस्टार्समध्ये होणारी गल्लत आणि याचा या क्षेत्रातील कलाकारांना बसणारा फटका हे सगळं यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
या डॉक्युमेंट्रीमध्ये या वेबसाईटसाठी आणि एकंदरच पॉर्नविश्वात काम करणारे सुप्रसिद्ध पॉर्नस्टार्स त्यांचे अनुभव आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. याबरोबरच या इंडस्ट्रीतील बऱ्याच अज्ञात गोष्टींचा उलगडा या माहितीपटात होणार आहे. येत्या १५ मार्चपासून ही डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे.