सध्या बॉलिवूडमधील बरेच कलाकार हे ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळायला लागले आहेत. बऱ्याच लोकांनी वेब सीरिजमधून आधीच ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. आता असाच एक मल्टी स्टारर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पंकज त्रिपाठी, सारा अली खान व करिश्मा कपूर हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार प्रथमच एकत्र येणार आहेत.

‘मर्डर मुबारक’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, सारा अली खान, करिश्मा कपूर, विजय वर्मा, टिसका चोप्रा, डिंपल कपाडीया, संजय कपूर आणि सोहेल नय्यर असे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर समोर आला असून सोशल मीडियावर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

आणखी वाचा : अरबाज व शुराचा रोमॅंटिक अंदाजातील ‘तो’ फोटो चर्चेत; नेटकरी म्हणाले, “याला म्हातारचळ…”

टीझरमध्ये पंकज त्रिपाठी एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत जे एका खुनाचा तपास करत आहेत. या खुनाचा संशय बहुतेक या चित्रपटातील प्रत्येक पात्रावर घेतला जाणार असल्याचं या टीझरमधून स्पष्ट होत आहे. कारण यातील प्रत्येक पात्र हे संशयित आणि गूढ वाटत आहे. याबरोबरच टीझरमधून ही एक मर्डर मिस्ट्री असणार आहे हेदेखील स्पष्ट होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

होमी अदजानिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून याचं दिग्दर्शन रुचिका कपूर हिने केलं आहे. हा एक सस्पेन्स कॉमेडी व मर्डर मिस्ट्री चित्रपट असणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच हा चित्रपट थेट प्रदर्शित होणार असून १५ मार्च पासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. प्रेक्षक या अनोख्या आणि हटके अशा मर्डर मिस्ट्रीची आतुरतेने वाट बघत आहेत.