OTT Release This Week: जुलै महिन्याची सुरुवात झाली आहे. आधीच्या सहा महिन्यात ओटीटीवर चित्रपट व सीरिजचा जबरदस्त जलवा पाहायला मिळाला. अनेक चित्रपट, सीरिज व शो ओटीटीवर रिलीज झाले. काही नव्या कलाकृती आल्या, तर ‘पंचायत’सह काही हिट सीरिजचे नवे सीझन आले, ज्याला प्रेक्षकांंचं खूप प्रेम मिळालं.
आता जुलै महिन्यात ओटीटीवर अनेक नवीन चित्रपट व सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन यांच्याही चित्रपटाचा समावेश आहे. या आठवड्यात तुम्हाला घरबसल्या कोणत्या कलाकृती पाहता येईल, त्याची यादी पाहुयात.
हेड्स ऑफ स्टेट
Heads Of State on OTT : ‘हेड्स ऑफ स्टेट’ हा हॉलीवूड चित्रपट आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्राची महत्त्वाची भूमिका आहे. ३ जुलैला रिलीज झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.
ठग लाइफ
Thug Life on OTT : मणि रत्नम यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात कमल हासन यांनी मुख्य भूमिका केली आहे. ‘ठग लाइफ’ चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत होता. मात्र या चित्रपटाला रिलीजनंतर प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही. कमल हासन यांनी कन्नड भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर कर्नाटकमध्ये सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. हा चित्रपट ३ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. तुम्ही तो घर बसल्या पाहू शकता.
कालीधर लापता
Kaalidhar Laapata on Zee5 : अभिषेक बच्चनचा आणखी एक चित्रपट ओटीटीवर रिलीज झालाय. ‘कालीधर लापता’ आज (४ जुलै रोजी) झी5 वर प्रदर्शित झाला आहे. यात अभिषेकने कालीधर नावाचे पात्र साकारले आहे. कालीधर कुटुंबाला साडून पळून जातो, नंतर त्याची भेट बल्लू नावाच्या मुलाशी होते. पुढे काय घडतं ते जाणून घ्यायला तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.
गुड वाइफ
Good Wife : ‘गुड वाइफ’ ही एक तमिळ सीरिज आहे. यात तरुणिका नावाच्या वकील असलेल्या तरुणीची गोष्ट पाहायला मिळेल. तिचा पती एका घोटाळ्यात अडकतो आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात जे घडतं, त्यावर बेतलेली ही सीरिज आहे. ही सीरीज तुम्हाला आज (४ जुलैपासून) जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.
द हंट (The Hunt: The Rajiv Gandhi Assassination Case)
‘द हंट: द राजीव गांधी असॅसिनेशन केस’मध्ये दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा सीबीआय तपास पाहायला मिळेल. यात भगवती पेरुमल, अमित सियाल, साहिल वैदसह अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट आज, ४ जुलैला सोनी लिव्हवर रिलीज झाला आहे.