अभिनेत्री, निर्माती पूजा भट्ट सध्या बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वामुळे चांगलीच चर्चेत असते. ती या शोमधील स्ट्राँग सदस्यांपैकी एक आहे. बिग बॉस ओटीटी सुरू झाल्यापासून अभिनेत्री आपल्या पर्सनल लाईफबाबत बोलताना दिसत आहे. चित्रपटसृष्टीत आलेला अनुभव इतर सदस्यांबरोबर शेअर करताना पाहायला मिळत आहे. अशातच पूजाने बिग बॉसच्या घरात बोलता बोलता एक मोठा खुलासा केला आहे. वडील महेश भट्ट व स्वतः १२ वी पास नसल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. तसेच यामागचे कारणही तिने सांगितलं आहे.

आलिया भट्ट हिनेदेखील शालेय शिक्षण पूर्ण केलेले नाही, हे आता सर्वांनाच माहीत आहे. ती १२ वी पासही नाही, तरीही ती बॉलीवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ज्याप्रमाणे आलियाबरोबर घडले, तसेच काहीसे पूजा भट्टबरोबरही घडले होते. याबाबत बिग बॉस ओटीटीच्या घरातील सदस्यांबरोबर बोलताना पूजा भट्ट म्हणाली की, “माझे वडील महेश भट्ट यांनी मला शाळेतून काढून टाकले होते.”

हेही वाचा – गेट वे ऑफ इंडियासमोर बॉयफ्रेंडला लिपलॉक केल्यामुळे ‘ही’ अभिनेत्री चर्चेत; फोटो झाले व्हायरल

हेही वाचा – अभिनेत्रीने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधला सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “दिग्दर्शक, निर्माता अन् प्रमुख अभिनेत्याबरोबर…”

यामागच्या कारणाचं स्पष्टीकरण देत पूजाने सांगितले की, “पदवी व शिक्षणाचा काहीही संबंध नसतो. पदवी ही एका व्यक्तीच्या शिक्षणाबद्दल सांगू शकते, पण ती व्यक्ती किती सक्षम आहे हे सांगू शकत नाही. शिवाय क्षमतेबाबतही सांगू शकत नाही.”

हेही वाचा – ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणबीर व ऋषी कपूर यांच्यात सतत व्हायचे वाद, जाणून घ्या कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महेश भट्ट यांनीही शालेय शिक्षण अधिक घेतले नाही. परंतु, यामुळे हे समजले की, पदवी व शिक्षणाचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. मी १२ वी पास नाही, पण तरीही मला इंग्रजी चांगले येते. याचे पूर्ण श्रेय पारसी शाळेला आहे. जिथे मी शिकले होते”, असं पूजा भट्ट म्हणाली.