ज्या रियालिटी शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते त्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सीझनची सुरुवात दणक्यात झाली आहे. बॉलीवूड सेलिब्रिटीज ते टीव्ही स्टार्स यांनी या नव्या सीझनमध्ये हजेरी लावली आहे. १७ जूनपासून ‘बिग बॉस ओटीटी २’ला सुरुवात झाली. बॉलीवूड अभिनेत्री पूजा भट्ट हिनेदेखील या नव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला असून नुकत्याच एका एपिसोडमध्ये तिने तिच्या आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत.

‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये स्पर्धकांबरोबर संवाद साधताना पूजा भट्टने वयाच्या ४४ व्या वर्षी दारूचे व्यसन सोडण्याबाबत भाष्य केलं आहे. याविषयी पूजा म्हणाली, “मला दारूचं प्रचंड व्यसन होतं अन् मी ते कधीच लपवून न ठेवता सगळ्यांसमोर मान्य केलं. यानंतर मी दारू सोडण्याचा निश्चय केला.” आपला समाज दारूचं व्यसन असलेल्या स्त्रियांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो याबद्दलही पूजाने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : नितेश तिवारी यांच्या आगामी रामायणावरील चित्रपटाबद्दल ओम राऊतचं वक्तव्य; म्हणाला, “राम भक्तांप्रमाणे…”

ती म्हणाली, “समाजात पुरुषांना एक प्रकारचा परवानाच दिला आहे, ज्यामुळे ते उघडपणे त्यांच्या वाईट सवयींबद्दल, व्यसनाबद्दल बोलू शकतात. आजही महिलेने दारूचं सेवन करणं योग्य मानलं जात नसल्याने त्या त्यांच्या या व्यसनाबाबत मोकळेपणे बोलूही शकत नाहीत. जेव्हा मी दारू सोडायचा निर्णय घेतला तेव्हा मी याबद्दल उघडपणे बोलायचं ठरवलं. मी वयाच्या ४४ व्या वर्षी दारू सोडली.”

View this post on Instagram

A post shared by Pooja B (@poojab1972)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस ओटीटी २’च्या प्रीमियर एपिसोडमध्ये दिबांग, अजय जडेजा, सनी लिओनी, पूजा भट्ट, मुकेश छाब्रा, एमसी स्टॅनसारख्या सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. या नव्या सीझनमध्ये अवघ्या २४ तासांत पुनीत सुपरस्टार घराच्या बाहेरही आला. ‘बिग बॉस’ टेलिव्हिजनप्रमाणेच ‘बिग बॉस ओटीटी २’चंही सूत्रसंचालन सलमान खान करीत आहे.