नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय क्राइम सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी सुभद्राची भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडेने साकारली होती. नवाजुद्दीनसोबतचा तिचा इंटिमेट सीन सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर तिला ‘पॉर्न अ‍ॅक्टर’ म्हणून संबोधित करण्यात आलं असं राजश्रीने उघड केलं आहे.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत राजश्रीने सांगितलं की ‘सेक्रेड गेम्स’मधील तिचा इंटिमेट सीन केवळ व्हायरल झाला नाही तर तो मॉर्फही करण्यात आला आणि त्याचा गैरवापरही झाला. “सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीझननंतर हा सीन व्हायरल झाला आणि तो मॉर्फ झाला, तो सर्वत्र एका वेगळ्या प्रकारचा चित्रपट म्हणून व्हायरल झाला. इतकंच नाही तर माझ्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट्स लिहिल्या गेल्या,” असं राजश्री म्हणाली.

मराठमोळ्या बॉलीवूड अभिनेत्रीचा १४ वर्षांचा संसार मोडला, ९ वर्षांची आहे लेक; घटस्फोटाबाबत म्हणाली, “मला माझी…”

या सीनमध्ये नवाजुद्दीन, दिग्दर्शक अनुराग कश्यप, एडिटर आणि डीओपी यांचाही समावेश होता, पण त्यांना कोणीच प्रश्न विचारले नाही. फक्त माझ्याबद्दलच बोललं गेलं. “कोणीही बोललं नाही की नवाज देखील त्याचा एक भाग होता, कोणीही अनुरागला विचारलं नाही की तू ते का शूट केलंस, कोणीही एडिटरला विचारलं नाही की तू ते तसं का एडिट केलंस. ‘तू हे का केलं?’ असा प्रश्न विचारण्यात आलेली एकमेव व्यक्ती म्हणजे मी. पत्रकारही माझा ‘एक पॉर्न अभिनेत्री’ असा उल्लेख करतात. आज माझी पूर्ण ओळख फक्त ‘सेक्रेड गेम्स’ मधील अभिनेत्री इतकीच आहे,” असं राजश्रीने नमूद केलं.

‘या’ अभिनेत्रीने करिअरमध्ये केले फक्त ७ सिनेमे; सुपरस्टारशी लग्न, मुलीचा जन्म अन् ९ वर्षांनी घेतलेला जगाचा निरोप

View this post on Instagram

A post shared by Rajshri (@rajshri_deshpande)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी, ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत राजश्रीने सांगितलं होतं की ती इंटिमेट सीन शूट करताना अजिबात अस्वस्थ नव्हती. “मला आनंद आहे की मला सुभद्राची भूमिका करायला मिळाली कारण ती गायतोंडेच्या आयुष्यातील एक महत्त्वाची भूमिका आहे. मी जे पात्र साकारलंय त्यात सहमती असलेलं प्रेम होतं. पण दुर्दैवाने आपला समाज यावर चर्चा करू इच्छित नाही. आम्ही मासिक पाळीबद्दल बोलत नाही, त्यामुळे सेक्सबद्दल बोलायचं तर विसरूनच जा,” असं राजश्री म्हणाली होती.