आजकल चित्रपटाच्या प्रदर्शनाप्रमाणेच त्याच्या ओटीटी रिलीजसाठीदेखील आपल्याला उत्सुकता पाहायला मिळते. एखादा चित्रपट कोणत्या ओटीटीवर येणार, त्याचे हक्क कितीला विकले गेले अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. चित्रपटरसिक खूप दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही चित्रपटांची वाट पाहत आहेत. हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ आणि वरुण व धवन क्रीती सनॉनचा ‘भेडिया’ हे दोन्ही चित्रपट याच कारणामुळे चर्चेत होते.

यापैकी आता हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल नवी अपडेट समोर आली आहे. ‘विक्रम वेधा’ आणि ‘भेडिया’ हे दोन्ही चित्रपट अद्याप कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेले नाहीत कारण हे दोन्ही चित्रपट लवकरच लाँच होणार्‍या जियोच्या नवीन सुपर अॅपवर प्रदर्शित केले जाणार असल्याचं म्हंटलं जात होतं, पण आता प्रतीक्षा संपली आहे.

आणखी वाचा : नागा चैतन्यसह डेटिंगच्या अफवांबद्दल शोभिता धूलीपालाने अखेर सोडलं मौन; म्हणाली, “त्यांना उत्तरं…”

या दोन चित्रपटांपैकी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १२ मे पासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. नुकतंच ‘जिओ सिनेमा’ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तब्बल ६ महिन्यांहून अधिक काळ प्रेक्षक या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची आतुरतेने वाट बघत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘विक्रम वेधा’ हा पहिले ८ मे या दिवशी येणार होता अशी बातमी समोर आली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन ६ महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी हे अजून ओटीटीवर प्रदर्शित न झाल्याने बरेच प्रेक्षक खोळंबले होते. या चित्रपटाला लोकांनी चांगलीच पसंती दर्शवली. ‘विक्रम वेधा’ हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. पुष्कर गायत्री याच जोडगोळीने मूळ चित्रपट आणि हा रिमेक दिग्दर्शित केला आहे.