scorecardresearch

Premium

सलमान खानचा ‘टायगर ३’ आता ओटीटीवर होणार प्रदर्शित? कुठे आणि कधी पाहता येणार? घ्या जाणून….

हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार याबाबतची मोठी माहिती समोर आली आहे.

Tiger 3 ott
'टायगर ३' ओटीटीवर होणार प्रदर्शित

सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुचर्चित बहुप्रतीक्षित चित्रपट ‘टायगर ३’ १२ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरपासूनच प्रेक्षकांमध्ये ‘टायगर ३’बाबत क्रेझ बघायला मिळाली होती. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. मात्र, त्यानंतर ‘टायगर ३’च्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट पाहायला मिळाली होती.

हेही वाचा- ‘अ‍ॅनिमल’च्या OTT रिलीजबद्दल नवी अपडेट; वाचा कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार रणबीरचा चित्रपट

chamkila-movie-release-date
ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार इम्तियाज अलीचा बहुचर्चित चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’; वाचा कुठे पाहायला मिळणार?
Song from the movie Jaga Char Diwas produced by Jagruti Entertainment news
‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा गीत ध्वनिमुद्रणाने मुहूर्त..
geethanjali-malli-vanchidi
चक्क स्मशानभूमीत प्रदर्शित होणार चित्रपटाचा टीझर; चित्रपटसृष्टीतील पहिल्या सर्वात धाडसी इव्हेंटबद्दल जाणून घ्या
lal-salaam-ott
बॉक्स ऑफिसवर आपटलेला रजनीकांत यांचा ‘लाल सलाम’ लवकरच येणार ओटीटीवर; वाचा कधी अन् कुठे पाहता येणार?

‘टायगर ३’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ४४.५ कोटींची कमाई केली होती. मात्र, दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईत घट होताना बघायला मिळत आहे. भारतात ‘टायगर ३’ला ३०० कोटींची कमाई करणे अवघड झाल्याचे दिसून येत आहे. भारतात या चित्रपटाने आतापर्यंत २७२.४३ कोटींची कमाई केली आहे; तर जगभरात या चित्रपटाने ४४७ कोटींचा गल्ला जमवला आहे. रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ आणि विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटांचा ‘टायगर ३’च्या कमाईवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा- Video: अखेर भांडण मिटलं! कपिल शर्मा-सुनील ग्रोव्हर सहा वर्षांनी दिसणार एकत्र; दोघांनी नव्या शोची केली घोषणा

चित्रपटगृहांमध्ये जरी सलमानच्या ‘टायगर ३’ची क्रेझ ओसरली असली तरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करीत आहेत. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. येत्या १२ डिसेंबरला हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे; पण अद्याप याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा-

‘टायगर ३’मध्ये सलमान खान, कतरिना कैफबरोबर इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहे. इमरानने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि शाहरुख खानने कॅमिओ केला आहे. ‘टायगर’ व ‘टायगर जिंदा है’प्रमाणे ‘टायगर ३’मध्येही प्रेक्षकांना सलमान आणि कतरिनाचा अ‍ॅक्शन  लूक बघायला मिळत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Salman khan katrina kaif tiger 3 ott release date out where to watch online dpj

First published on: 06-12-2023 at 12:45 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×