मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि सरकारी अधिकारी समीर वानखेडे हे जोडपं कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. क्रांती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती नेहमी सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याचदा ती तिच्या जुळ्या मुलींचे व्हिडीओ किंवा त्यांचे किस्से शेअर करत असते.

अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडे म्हणाले, “मी क्रांतीला…”

क्रांती आपल्या जुळ्या मुलींबद्दल सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी शेअर करत असते. पण अद्याप त्यांचे फोटो तिने शेअर केलेले नाहीत. अशातच खुपते तिथे गुप्ते शोमध्ये समीर वानखेडेंनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या जुळ्या मुलींची नावं आणि त्यांची नावं ठेवण्यामागची कारणं सांगितली. समीर व क्रांतीच्या जुळ्या मुलींची नावं झिया व झिडा अशी आहेत.

शाहरुख खान की नवाब मलिक, सर्वात जास्त राग कुणाचा येतो? समीर वानखेडे म्हणाले, “कुठला…”

झिडाचं नाव हे समीर यांच्या आईच्या नावावरून ठेवलंय. त्यांच्या आईचं नाव झिडा होतं. तर, झियाचं नाव समीर यांच्या आत्याच्या नावावरून ठेवलंय. “आत्याला कॅन्सर झाला होता आणि माझं आत्यावर खूप प्रेम होतं, त्यामुळे तिच्या नावावरून मुलीचं नाव ठेवलं,” असं समीर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, क्रांती रेडकरने २०१८ मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला होता. त्या दोघी आता ५ वर्षांच्या आहेत. त्या दोघींना सांभाळताना क्रांतीची दमछाक होते. अनेकदा क्रांती लेकींचे मजेदार किस्से तिच्या व्हिडीओतून शेअर करत असते.