क्रिकेट विश्व चषकात दमदार खेळी करणारा क्रिकेटपटू शुबमन गिल व सारा अली खान हे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांवर साराने मौन सोडलं आहे. ‘कॉफी विथ करण सीझन 8’ मध्ये तिने अनन्या पांडेबरोबर हजेरी लावली. यावेळी तिने शुबमनला डेट करण्याच्या सर्व चर्चा फेटाळल्या. इतकंच नाही तर तिने एक सूचक विधानही केलं आहे.

Video: रश्मिका मंदानाचा आक्षेपार्ह बनावट व्हिडीओ व्हायरल, अमिताभ बच्चन यांची कायदेशीर कारवाईची मागणी

करणच्या टॉक शोच्या आगामी भागाचा एक प्रोमो व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये सारा आणि अनन्या पांडे दिसत आहेत. क्लिपमध्ये करण तिला शुबमनला डेट करण्याबद्दल विचारतो. त्यावर सारा तिच्या आणि शुबमनच्या डेटिंगच्या अफवांना पूर्णविराम देते. “तुम्ही चुकीच्या साराबद्दल बोलताय. संपूर्ण जग चुकीच्या सारामागे लागलंय,” असं ती म्हणते. साराचं म्हणणं ऐकल्यावर वाटतंय की ती अप्रत्यक्षपणे सारा तेंडुलकरकडे इशारा करत आहे.

अवघ्या तीन वर्षांत मोडलं पहिलं लग्न, अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून शुबमन गिल दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला डेट करत असल्याची अफवा आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक सामन्यांमध्ये सारा तेंडुलकर अनेकदा शुबमनला चिअर करताना दिसते. सारा अली खान आणि शुबमन यांच्या डेटिंगच्या अफवांना तेव्हा सुरुवात झाली जेव्हा ते डिनर डेटवर एकत्र दिसले होते. मात्र, साराच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरून ते डेट करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साराला यापूर्वी एकदा क्रिकेटपटूशी लग्न करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ती तिची आजी शर्मिला टागोर प्रमाणे क्रिकेटपटूशी लग्न करेल का? अस विचारल्यावर सारा म्हणाली होती की तिला जोडीदाराच्या व्यवसायाने फरक पडत नाही. “मला वाटते की मी ज्या प्रकारची व्यक्ती आहे त्यानुसार जोडीदार काय करतो, याचा मला फरक पडत नाही. अभिनेता, क्रिकेटर, बिझनेसमॅन, डॉक्टर… कदाचित डॉक्टर नाही कारण तो पळून जाईल. मस्करी करतेय, पण एखाद्या व्यक्तीशी माझं मानसिक आणि बौद्धिक स्तरावर जुळायला हवं, तरंच मी त्याच्याबरोबर राहू शकेन,”असं ती म्हणाली होती.