तीन मित्रांची धमाल कथा सांगणारी ‘शांतीत क्रांती’ या वेबसीरिज प्रेक्षकांना भरभरुन प्रेम केले होते. अभय महाजन, ललित प्रभाकर आणि अलोक राजवाडे या तिघांची मुख्य भूमिका असलेल्या या वेबसीरिजला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. पहिल्‍या सीझनला मिळालेल्‍या उदंड प्रतिसादानंतर सोनी लिव्‍ह ‘शांतीत क्रांती’चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच ‘शांतीत क्रांती’ या वेबसीरिजचा दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘शांतीत क्रांती’च्या दुसऱ्या सीझनमध्ये हे तीन मित्र १८ महिन्यांनी पुन्हा भेटतात. यातील एक श्रेयस (अभय महाजन) हा त्याच्या मित्रांना आपण लग्न करत असल्‍याची आनंदाची बातमी देतो. यानंतर ते तीनही मित्र मिळून श्रेयसच्‍या इंटरनॅशनल बॅचलर ट्रिपवर जाण्‍याचे नियोजन करतात. यात प्रसन्‍न (‍ललित प्रभाकर) त्‍याच्‍या बाळाला सोबत आणले आहे.
आणखी वाचा : लाडक्या बाप्पाला निरोप देताना श्रेया बुगडे भावूक; म्हणाली, “पाच दिवसात तुझ्यासमोर हात जोडताना…”

तर दिनारने (अलोक राजवडे) बॅचलरच्‍या ट्रिपऐवजी १० अनोळखी व्‍यक्‍तींसह नेपाळला ६ दिवसांच्‍या तीर्थयात्रेवर जाण्‍यासाठी बस बुक केली आहे. यामुळे आता त्यांच्या बॅचलर ट्रिपमधील कथेत कोणकोणते ट्विस्ट येणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘शांतीत क्रांती’ या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये काही नवीन पात्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सीरिजचे दिग्‍दर्शन सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्‍लीन यांनी केले आहे. या सीरिजमध्‍ये अभय महाजन, आलोक राजवडे, ललित प्रभाकर, मृण्‍मयी गोडबोले, प्रिया बॅनर्जी, प्रियदर्शिनी इंदलकर हे कलाकार झळकणार आहेत. येत्या १३ ऑक्टोबरपासून ‘सोनी लिव्ह’वर ही वेबसीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.