कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लग्नबंधात अडकले आहेत. त्या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. शेहशाहमधील जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधल्याने त्यांच्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अशातच या दोघांच्या लग्नाबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी ९ फेब्रुवारीला दिल्लीत पार पडली. रिसेप्शन पार्टीतील सिद्धार्थ आणि कियाराच्या फोटोंची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, हे कपल पापाराझींना पोज देण्यासाठी बाहेर आले नाही. यामागच्या कारणाचा खुलासा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

‘झूम’मधील एका अहवालानुसार, सिद्धार्थ आणि कियारा यांनी त्यांच्या रिसेप्शन पार्टीनंतर पापाराझींसाठी पोज दिले नाहीत, कारण त्यांनी त्यांच्या लग्नाचे हक्क ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime Videos ला विकले आहेत. दिल्लीत झालेल्या या रिसेप्शन पार्टीत सिद्धार्थ आणि कियाराने मागच्या गेटमधून एन्ट्री घेतल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थ व कियाराच्या लग्नानंत अॅमेझॉनने एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे या दोघांनी लग्नाचे हक्क ओटीटी प्लॅटफॉर्मला विकल्याची सध्या चर्चा आहे. पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.